शेतातील बंड्यातून ६२ बकऱ्या गेल्या चोरीला….

0

🔥शेतकरी अवचट यांचे अंदाजे सहा लाखाचे नुकसान,

🔥शेतात काम करणारे दोन सालगडीही बेपत्ता,परसोडी शिवारातील घटना.

🔥संशयित सालगडी व अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल..

सिंदी (रेल्वे) / येथील परसोडी शिवारातील शेतातील बंड्यातून ६२ बकऱ्या चोरीला गेल्याची घटना बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून शेतात काम करणारे दोन सालगडी हे सुद्धा बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी शेतकरी युगल सत्यनारायण अवचट यांच्या तक्रारीवरून संशयित दोन सालगडी तसेच अज्ञात आरोपींविरुद्ध सिंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी युगल सत्यनारायण अवचट यांची शेती मौजा परसोडी शिवारात असून त्यांच्या शेतात जनावरे तसेच बकऱ्या बांधण्यासाठी गोठा आहे.शेतकरी अवचट यांच्या शेतावर काम करण्यासाठी दोन सालगडी आहे. विठ्ठल परसाके वय वर्ष (४०) राहणार पिंपळी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ हा सालगडी मागील सात वर्षांपासून कामावर आहे तर रामा बोरीकर (३८) राहणार हिंगणघाट जिल्हा वर्धा हा एक वर्षांपासून कामावर असून दोघेही अवचट यांच्या शेतात राहतात.बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी शेतात हरभऱ्याची संवगनी करून नेहमी प्रमाणे शेतकरी यांनी आपल्या शेतात दोन बैल,दोन गाई व ७१ बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या.दरम्यान बुधवारी रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरट्यांनी शेतात बांधून असलेल्या ७१ बकऱ्यांपैकी ६२ बकऱ्या चोरून नेल्या. सुदैवाने दोन बैल व दोन गाई तसेच ९ बकऱ्या शेतात सापडल्या.ही बाब शेतकरी सकाळी पहाटे शेतात गेल्यावर अवचट यांच्या निदर्शनास आली. अवचट यांनी सालगडी यांना शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते कुठेही दिसून आले नाही.
शेतकरी अवचट यांनी सकाळी पोलीस स्टेशन गाठून सिंदी पोलिसांना घटनेची माहिती दिली.परिणामी, पीएसआय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात गुरुवारी एक पथक आरोपीच्या शोधात जाऊन इतरत्र शोध घेतला परंतु काही निष्पन्न झाले नाही. शेतकरी युगल अवचट यांचे अंदाजे ६ लाखांचे नुकसान झाले आहेत. दोन्ही सालगड्यांनी हा बनाव रचला असावा,अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे सायंकाळी शेतकरी युगल सत्यनारायण अवचट यांच्या तक्रारीवरून संशयित सालगडी विठ्ठल परसाके, रामा बोरीकर व अज्ञात आरोपींविरुद्ध सिंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज /24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!