संजयभाऊ जयसिंगकार यांचे नेत्रदान,समाजासाठी केला,आदर्श प्रस्थापित…..

0

वर्धा -/ मुत्यू हे जीवनाचे अपरिहार्य सत्य असले तरीही मानव,आपलें जीवन सार्थकी लावण्यासाठी कट्टीबध्द असतो.असेच महान कार्य आर्वी येथील मूळ निवासी व सध्या जुना उमरसरा परिसरातील वसंत लेआऊट यवतमाळ येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते संजय वामनराव जयसिंगकार यांचे नुकतेच एम्स हाँस्पिटल नागपूर येथे निधन झाले ते ५८वर्षाचे होते.३०नोव्हेंबर ला एसपी आँफिस ते बसस्थानक चौकादरम्यान त्यांचा अपघात झाला. होता. त्यांच्या पश्चात पत्नी प्रेमलता ताई व अथर्वा,ईनाय ही मुले तसेच अक्षरा ही मुलगी आणि मोठा आप्तपरिवार,आहेत. त्यांच्या मुत्यनंतर नेत्रदान करुन समाजासमोर एक आगळावेगळा व नैतिक आदर्श निर्माण केला आहेत. विशेष म्हणजे त्यांचा इशान हा मुलगा १००%टक्के अंध आहेत तर दुसरा ८५%अंध आहेत.मी आर्वी तहसील मध्ये १९९१-९२ मध्ये मी त्याच्या सोबत सुशिक्षित बेरोजगार म्हणून काम केले असुन, अतिशय हसतमुख व्यक्ती मत्वाचे,निगर्वी स्वभावाचे संजय भाऊसाहेब आमच्या सोबत नसले तरीही त्यांच्या आदर्शावर वाटचाल करण्यासाठी आम्ही कट्टीबध्द आहोत.सामाजिक कार्याचा वसा घेऊन त्यांचा आदर्श समाजासाठी दिशादर्शक व मार्गदर्शक आहेत.

ब्युरो रिपोर्ट साहसिक NEWS -24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!