शिवसेना (उबाठा )शाखा साहुर च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.
साहुर,आष्टी / तालुक्यातील साहूर येथे जाम नदीवर बोरखडी शिवारात जाण्याकरिता दोन कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आली हे बंधारे जगदंबा कन्स्ट्रक्शन नागपूर च्या ठेकेदारा मार्फत मृद जलसंसाधन विभाग आर्वी मार्फत करण्यात आले परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून शेतकऱ्यांना नागरिकांना तसेच जनावरांना धोक्याचे ठरत आहे पुलावर कठाडे नसल्याने अनेक जनावरे खाली पडून मृत्युमुखी पडत आहे तसेच कोल्हापुरी बंधारे हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने या ठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता आहे यामध्ये सिमेंटचा वापर अतिशय कमी असून माती मिश्रित रेतीचा व मातीचा वापर केलेला आहे त्यामुळे हा बंधारा कधी कोसळेल हे सांगता येत नाही या बंधाऱ्यांकरीता शासनाच्या वतीने दोन कोटीच्या जवळ निधी मंजूर होता म्हणून शिवसेना शाखा साहुर च्या वतीने आष्टी येथील तहसील कार्यालयात याबाबत निवेदन देण्यात आले जर कोल्हापुरी बंधार्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली नाही तर शिवसेना शाखा साहुर च्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नानकसिंग बावरी, अशोक भाऊ ढबाले , सुरेश भाऊ ढबाले,विजय गावंडे , प्रफुल मुंदाने , श्याम शिर्के ,छगन ढोरे ,विनायक हेडाऊ , अनिल धुर्वे, प्रवीण मोहिते ,सुरेश टरके ,हरीश लाड , शरद वरकड उपस्थित होते.