साहुर येथील पशुवैद्यकीय दवाखाना रामभरोसे…
हाच तो पशुवैद्यकीय दवाखाना रामभरोसे,दवाखान्याचे वेळापत्रक नाममात्र..
साहुर,आष्टी -/ तालुक्यातील साहुर येथे पशुवैद्यकीय दवाखाना असून हा दवाखाना श्रेणी एक चा आहे परंतु या दवाखान्यात पशुंवर व गुरांढोरांवर योग्य उपचार होत नसल्याने आणि दवाखान्यात कर्मचाऱ्यांची येण्या-जाण्याची वेळ निश्चित नसल्याने पशुपालक संकटात आले आहे गले लठ्ठ पगार घेणारे कर्मचारी सतत गैरहजर असतात त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखान्याची उघडण्याची वेळ सकाळी नऊ वाजता आहे परंतु येथील कर्मचारी वेळेवर येत नसून दुपारी अकराच्या नंतर येतात त्यामुळे पशुपालक मोठ्या संकटात सापडले असून येथील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी पशुपालकांची मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून हाच धंदा सुरू असून कित्येक जनावरांना आपले प्राण गमवावे लागले त्यामुळे आज सुद्धा काही पशुपालक सकाळी आठ वाजता पासून आपल्या जनावरांना घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यात आले होते परंतु अकराही वाजले तरी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी पत्ता नव्हता मीटिंगच्या नावावर अधिकारी सतत गैरहजर असल्याची चर्चा साहुर गावात सर्व पशुपालक करीत आहे जर फक्त मीटिंगाच घ्यायच्या असेल तर दवाखाने बंद करून फक्त मीटिंगाच घ्याव्या जणेकरून पशुपालक खाजगी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊ शकेल आणि सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यावर अवलंबून राहणार नाही असे मत पशुपालकांनी व्यक्त केले या सर्व प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ते दखल घेऊन व चौकशी करून लवकरात लवकर येथील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पशुपालक करीत आहे जिल्हा पशुसंवर्धन विभाग वर्धा यांनी ताबडतोब चौकशी करून पशुपालकांना न्याय मिळवून देण्याची विनंती प्रतिनिधींशी बोलतांना केली हे विशेष. येथीमील पशुपालसाहुरक असून माझे वासरू बिमार पडले त्यामुळे मी सकाळी आठ वाजता पासून साहुर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आलो परंतु दवाखान्याला कुलुप लागले होते त्यामुळे मी येथील कर्मचाऱ्यांची वाट पाहत होतो अकरा वाजले तरी सुध्दा कोणताच कर्मचारी आला नाही आम्ही सर्व पाचही पशुपालक आपापल्या जनावरांना घेऊन परत गेलो तेव्हा मला समजले की हा दवाखाना रामभरोसे आहे आमच्या जनावराला कमी जास्त झाले तर यासाठी येथील कर्मचारी अधिकारी दोषी असेल( उमेश रमेश राऊत पशुपालक साहूर)
शरद वरकड साहसिक न्यूज -/24 साहूर आष्टी