सिंदी(रेल्वे)चा आरोग्य प्रश्न पेटला.! ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी भजन आंदोलनातून प्रशासनाला इशारा….

0

सिंदी(रेल्वे)चा आरोग्य प्रश्न पेटला.! ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी भजन आंदोलनातून प्रशासनाला इशारा.

सिंदी(रेल्वे) -/ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, या जिव्हाळ्याच्या मागणीसाठी सिंदी (रेल्वे) शहरासह परिसरातील नागरिक शनिवारी रस्त्यावर उतरणार आहेत. याकरिता बसस्थानक चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भजन आंदोलनाच्या माध्यमातून नागरिक शांत, मात्र ठाम स्वरात आपली भूमिका मांडणार आहेत.
परिसरातील हजारो नागरिकांसाठी हे एकमेव शासकीय आरोग्य केंद्र असतानाही आजही केवळ प्राथमिक स्वरूपातील उपचारच उपलब्ध असल्याने गंभीर रुग्णांना वर्धा किंवा नागपूरकडे हलवावे लागते. ही परिस्थिती म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी थेट तडजोड असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शासन विकासाच्या घोषणा करते; मात्र सिंदी (रेल्वे)च्या आरोग्य सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी इतरत्र खर्च केला जातो; मग सिंदी (रेल्वे)च्या ग्रामीण रुग्णालयासाठी निधी का नाही, असा थेट सवाल प्रशासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून विचारला जाणार आहे.
या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. सिंदी (रेल्वे)ला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार यानिमित्ताने आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सिंदी, वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!