सिंदीला तालुक्याचा दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे भव्य आंदोलन….

0

🔥तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी यांचे स्वयंघोषित उभारले होते कार्यालय.🔥भर पावसात बसस्थानकावर तीन तास केले ठिय्या आंदोलन.🔥चार मुख्य मागण्यांपैकी एक मागणी पूर्ण

सिंदी (रेल्वे) -/ शहराला तालुक्याचा दर्जा तसेच नगर पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी, तहसील कार्यालयात सातही दिवस नायब तहसीलदार व सिंदी शहरात १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय या मागण्यांसाठी आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली सिंदी (रेल्वे) तालुका संघर्ष समितीद्वारा महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यादरम्यान मोर्चेकरांकडून बसस्थानकावर तीन तास चक्का जाम करून भर पावसात ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रसंगी चार मागण्यांपैकी एक मागणी पूर्ण करण्यात आली तर तीन मागण्यांसाठी मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून लवकरच या तीन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले.
सिंदी शहराला स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगरपरिषद आहे. येथून २ कि.मी. अंतरावर नागपूर जिल्हा सुरू होतो. या शहराच्या आजू-बाजूला ३५ ते ४० खेडे आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना सिंदी येथे जाणे सहज सोयीचे आहे. परंतु, येथे नायब तहसील कार्यालयात नायब तहसिलदार राहत नसल्याने नागरिकांना सतत सेलू तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात, उत्पन्नाचा दाखला, ॲफेडेव्हिट अधिवास प्रमाणपत्र, खरेदी-विक्रीचे व्यवहार, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, व इतर कोणतेही अडचण आल्यास सेलू येथे २३ किलोमीटर अंतर कापून तहसील कार्यालयात जावे लागते. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागते.
या करीता सण २००४ व सण २०१५ मध्ये शासनाला निवेदन देऊन सिंदी शहराला तहसीलचा दर्जा मिळण्याकरीता मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याचा उपयोग एवढाच झाला की सिंदी येथे मा. नायब तहसीलदाराला बेंच देऊन आठवड्यात १ दिवस सिंदीला दिले अर्थात नागरीकांचा १० टक्के त्रास वाचला परंतु ९० टक्के कायम आहे. यासंदर्भात दिनांक २७/०६/२०२४ मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मा. नायब तहसीलदार यांचे मार्फत जन आनंदोलन करून निवेदन देण्यात आले. मात्र, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. परिणामी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीद्वारा सिंदी (रेल्वे) तालुका संघर्ष समितीचा भव्य मोर्चा सोमवारी येथील नंदीचौकातून 12 वाजताच्या दरम्यान काढण्यात आला. सदर मोर्चा मुख्य मार्गाने मार्गक्रमण करून बसस्थानकावर पोहचला. यावेळी संतप्त मोर्चेकरांनी बसस्थानक चौकामध्ये चक्का जाम करून तीन तास भर पावसात ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी स्वयंघोषित तहसीलदार कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय, मुख्याधिकारी कार्यालय तयार करून उभारले होते. दरम्यान, नायब तहसीलदार मधुकर ठाकरे यांनी ठिय्या आंदोलनाला भेट देत वांदिले यांच्याशी चर्चा केली. परंतु, जोपर्यंत तीनही मुख्य मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, शिवाय आम्हाला जेलमध्ये टाकून द्या अशी भूमिका अतुल वांदिले यांनी घेतली.
ही माहिती तहसीलदार विकास ननवटे यांना मिळताच अवघ्या पाऊण तासात तहसीलदार ननवटे आंदोलनस्थळी पोहचून त्यांनीही अतुल वांदिले यांच्याशी 15 मिनिट चर्चा केली. चर्चे दरम्यान शेवटी सिंदी येथील तहसील कार्यालतात आठवड्यातून पाच दिवस नायब तहसीलदार उपस्थित राहण्याची ही एक मागणी पूर्ण करून नगर पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी, सिंदीला १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व सिंदी शहराला तालुक्याचा दर्जा या तीन मागण्यांबाबत लवकरच मंत्रालयाशी पाठपुरावा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी तहसीलदार ननवटे यांनी दिले.मोर्चे दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या भव्य मोर्चामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, सिंदी शहर अध्यक्ष गंगाधर कलोडे, युवा अध्यक्ष तुषार हिंगणेकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाशचंद्र डफ, उ.बा.ठा. चे शहर प्रमुख सचिन लांबट, मुन्ना शुक्ला सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व परिसरातील ४० गावातील नागरिक उपस्थित होते.

दिनेश घोडमारे साहसिक news-24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!