🔥सी ई टी परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयाला नाम फलक नसल्याने विध्यार्थी व पालकांची भटकंती.🔥आष्टी शहरात चर्चेला आले उधाण, रस्त्यावर वाहणाच्या लांबचं लांब रांगा, अपघाताची भीती.
आष्टी शहीद -/आष्टी शहरात महाविद्यालयाची नावाचे फलक न लावता सुरु असलेल्या सी ई टी परीक्षा केंद्रात बाहेर जिल्यातुन येणाऱ्या परीक्षार्थी विध्यार्थीना परीक्षा केंद्र शोधताना विविध संकटाचा सामना करावा लागला. सी ई टी परीक्षा केंद्र ज्या महावीध्यालयात देण्यात आले त्या महाविद्यालयात प्रवेश द्वारावर कोणताही नाम फलक नसल्याने विध्यार्थी यांच्या सह पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
सविस्तर असे कि,
आष्टी शहराच्या शेवटच्या टोकावर पेठ अहमदपूर ग्रामपंचायत च्या हद्दीत नावाचा फलक न लावता फार्मसी महाविद्यालय सुरु आहे. सुरु असलेल्या महाविद्यालययात नेमके कोणकोणते कोर्सेस आहे याबाबत सुद्धा कुणाला काहीच माहिती नाही. याच महाविद्यालययात सध्या सी ई टी परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून नागपूर व अमरावती व बाहेर जिल्ह्यात व वर्धा जिल्ह्यातुन येणारे परीक्षर्थी हे हाल तिकीट वर नमूद पत्त्यावर येऊन परीक्षा केंद्र शोधात संपूर्ण आष्टी शहर पिंजून काढल्यानंतर विद्यालयाच्या इमारतीवर नाम फलक नसल्याने विद्यार्थ्यांची भटकंती होत आहे. परीक्षा केंद्रावर भेट दिली तेव्हा वाहणाची पार्किंग ही आष्टी ते परसोडा मार्गांवर दिसून आली तर दुचाकी वाहणाची पार्किंग महाविद्यालययाच्या प्रवेश द्वारावर होती. ऐकूनच वाहतूक नियम धाब्यावर बसवून अवैध रित्या रस्त्यावर पार्किंग करणे कितपत योग्य असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.आष्टी शहरात सूरु असलेल्या चर्चा वरून कोणत्याही सुविधा, शाळा सुरु असताना निर्माणधीन अर्धवट इमारती मध्ये बांधकाम करणे हे कोणत्या नियमाच्या कक्षेत येते. तसेच मागील सहा वर्षांपासून सुरू असलेल्या फार्मसी कॉलेज ला शेवट नाव फलक न लावण्याचे कारण काय महाविद्यालय काही गुपित नाही ना हा प्रश्न निर्माण झालेला आहे बांधकाम सुरु असताना शालेय मुलांना जीव मुठीत घेऊन अध्यपण करावे लागते. गंभीर घटना धडल्यास जबाबदार कोण हे कळायला मार्ग नाही. शाळेत पुरेपूर व्यवस्था नसताना सी ई टी केंद्र शासनाने दिले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. बाहेर जिल्ह्यातील पालकांनी व विध्यार्थी यांनी केंद्रात सुरु असलेल्या अडचणींचा व समस्याचा जणू पाढाच वाचला. शासनाने याकडे लक्ष देऊन येथील केंद्र तात्काळ बंद करून दुसऱ्या ठिकाणी केंद्र देण्यात यावे अशी मागणी आहे.