सुरगाव येथे आदर्श धुलीवंदन सोहळा 28 वर्षाची परंपरा, विविध कार्यक्रमाचे आयोजन…..

0

🔥सुरगाव येथे आदर्श धुलीवंदन सोहळा
28 वर्षाची परंपरा, विविध कार्यक्रमाचे आयोजन.

सेलू -/ तालुक्यातील सुरगाव येथील गेल्या 28 वर्षाची परंपरा असलेला असलेला आदर्श धुलिवंदन सोहळां यावर्षी आयोजित कार्यक्रम पाहता हा सोहळा तालुक्यातच नव्हे तर जिल्हात नावारूपास आलेला आहे सप्तरखांची वादक प्रवीण देशमुख यांच्या पुढाकारातून होळी निर्माते अभिनव धुळवंड आणि संत विचार ज्ञानयज्ञ सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून दरवर्षी हा उत्सव मोठया आनंदात साजरा केला जातो.
रविवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यास सायंकाळी चार ते पाच उद्घाटन श्री मधुकररावजी ठाकरे नायब तहसीलदार सेलू, श्री रमेशरावजी भोले मंडळ अधिकारी सेलु माननीय प्रफुल लुंगे, महाकाळकर सेलू,यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे
सायंकाळी पाच ते सहा सामुदायिक प्रार्थना मार्गदर्शन मार्गदर्शन श्री मांडले दादा वर्धा सायंकाळी सहा ते सात स्नेहभोजन सायंकाळी सात ते दहा किर्तन कार श्री ह.भ.प. सागर महाराज नांदुरकर बोपापूर अजनसरा यांचे भारुड संपन्न होणार आहे. सोमवारी दोन मार्च रोजी पहाटे ग्रामसफाई सामुदायिक ध्यान सकाळी नामदेव योगासन आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुपारी एक ते दोन शेतकरी मेळावा व ग्राहक मिळावा सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा काल मेळावा सर्वधर्म समन्वय संमेलन सामुदायिक प्रार्थना रात्री सात ते दहा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादरकर्ते श्री तुषार सूर्यवंशी सप्त खंजिरी वादक नागपूर राष्ट्रीय प्रबोधनकार मंगळवार 3 मार्च रोजी ग्रामसफाई सामुदायिक ध्यान मार्गदर्शन सकाळी सहा ते सहा आठ या वेळात धुलीवंदन संदेश व प्रभात फेरी प्रमुख मार्गदर्शन सुरेश मांडले ,दादा हांडे वागदरकर मार्गदर्शन करणार आहे.त्यानंतर सकाळी सात आठ ते 11 संत संग पर्व संत विचार ज्ञान कार्यक्रम कार्यकर्ता सत्कार दान वाटप भजन संमेलन अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब फुटे समाजसेवक मोहन गुजर,मोहन अग्रवाल, शकुंतला पराजे तहसीलदार सेलू, मुरलीधरराव बेलखोडे अनिल, रेड्डी मोहन, शंकर मोहोळ,सुनील बुरांडे, भास्कर वाळके,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.दुपारी तीन ते पाच सांस्कृतिक कार्यक्रम सादरकर्ते श्री गुरुदेव सेवा मंडळ सुरगाव सायंकाळी पाच ते सहा सामुदायिक प्रार्थना सायंकाळी सहा ते दहा समारोपय कार्यक्रम प्रवीण देशमुख सप्त खंजिरी वादक सुरगाव यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

         चैताली गोमासे                    साहसिक News -/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!