🔥सेलूत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेनेचा शिवजयंती सोहळा उत्साहात.🔥विविध स्पर्धा, गुणवंतांचा सत्कार आणि शिवचरित्रावर आधारित सादरीकरणांनी रंगला शिवजन्मोत्सव सोहळा.
सेलू -/ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देशभक्तीच्या घोषणांनी आणि शिवगर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मनसे व मनविसेकडून शिवजयंतीच्या पर्वावर स्थानिक रेहकी चौकात विविध प्रकारच्या शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या तसेच तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी रेहकीच्या बाल कलाकारांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व त्यानंतर सादर केलेले शिवचरित्रावर आधारित गीत आणि थरारक पोवाड्यांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. दीपचंद चौधरी विद्यालयाचा पाचवीतील विद्यार्थी पृथ्वीराज विनोद येवले ह्याने आपल्या ओजस्वी वाणीतून महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी रिती रेवतकर नामक विद्यार्थिनीच्या शिवगर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यासोबतच रेहकी कला येथील ओम साई बाल भजन मंडळाच्या हृदयस्पर्शी सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळेच भावनिक स्वरूप प्राप्त झाले. छोट्या बाल कलाकारांनी सादर केलेल्या अभंग, देशभक्तीपर गीत, पोवाडे व भक्तीगीतांनी वातावरण भारावून गेले होते. यावेळी दीपचंदच्या विध्यार्थ्यांनी ‘शिवनेरीवर शिवबा जन्मला’ या गीतावर आकर्षक असे नृत्य सादर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी होते. प्रमुख अतिथी म्हणून दीपचंदच्या मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे, साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र कोटंबकार, ‘लोकमत’चे ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल लुंगे, ‘पुण्यनगरी’चे तालुका प्रतिनिधी संजय धोंगडे, मनविसेचे जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन अमृतकर, इंदिरा अकादमीचे संचालक श्रेय शर्मा, रेनबो अकादमीचे संचालक अंबुज पांडे, स्वामी समर्थ अकादमीचे संचालक अमित चापडे, प्रा. मेघा चांदनखेडे, ‘नवराष्ट्र’चे तालुका प्रतिनिधी अनिल वांदिले, ‘दैनिक भास्कर’चे तालुका प्रतिनिधी सतिश वांदिले, ‘देशोन्नती’चे तालुका प्रतिनिधी भारत घवघवे, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे, ‘तरुण भारत’चे आशिष धापूडकर, मनसेचे नागपूर जिल्हाध्यक्ष योगेश चणापे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.
याप्रसंगी हेमंत गडकरी, रविंद्र कोटंबकार, प्रफुल्ल लुंगे आदि मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचे आणि राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.
या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन मनविसेचे जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर व मनसेचे तालुका अध्यक्ष हरीश भस्मे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मनसेचे प्रथमेश बोरकर, मयूर दांडेकर,मुकुल खोडके, विकेश नागोसे, प्रज्वल लाडे, ओम मिश्रा, रोहण डायरे, गौरव भोंडवे, आयुष लिल्हारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
शिवजयंती निमित्त सेलूत झालेल्या या सोहळ्याने तरुणाईत नवचैतन्य निर्माण केले असून, “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी तसेच महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मान.! याप्रसंगी आजच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात प्रा. मेघा चांदनखेडे, किरण मुजबैले, वैभव कडुकर, सक्षम धानकुटे, यश दळवी, श्री अग्निहोत्री, सुहानी नेहारे, वैष्णवी चिकराम, वंशिका मोहिजे, वेदिका ठाकूर, शर्वरी नरड, अमृता भोयर, पूनम शिंदे, पलक जगताप, अंजली जगताप, डॉली साटोणे, नीलम शिंदे, हर्षिता मांढरे, साक्षी पारसे, फैजा शेख, ईश्वरी राऊत, पृथ्वीराज येवले, देवांश गुजरकर, नैतिक धानकुटे, श्री झाडे, भावेश वाघमारे, चेतन झाडे, आमोश धानकुटे, नंदिनी सावरकर, रिती रेवतकर आदि विविध क्षेत्रातील गुणवंत विध्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुछ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.