सेलू शहरातील १४ दारुविक्रेत्यांना शहरात नो एन्ट्री

0

 

प्रतिनिधी / सेलू :

येथील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता शहरातील १४ दारुविक्रेत्यांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सदर आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी नुकताच पारित केला.
शहरात नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारांकडून मतदारांना जाळ्यात ओढण्याकरिता शहरात दारु, ओल्या पार्ट्यासह लक्ष्मीदर्शनाचा सुद्धा बेत आखला जात आहे. त्यामुळे शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, ती अबाधित राहावी यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांनी मंगळवारी आदेश पारित करीत शहरातील १४ दारुविक्रेत्यांना १४ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीकरीता शहरात प्रवेशबंदीचा आदेश काढला. यात राजू चंद्रभान मांढरे, कुणाल उर्फ केशव भाऊराव पचारे, सुरज नारायण मांढरे, बॉबी संजय खोडे, दिवाकर संजय मांढरे, सनी संजय खोडे, सतिश दशरथ मते, स्वपनिल वसंत करलुके, भाऊराव शामराव पचारे, निलेश कैलास मांढरे, अजय रामकृष्ण परसखेडे, चेतन अवधूत गोंडाणे, सुरज विजय टवलारे, चिंतामण चिंधू पारसे या शहरातील दारुडंगऱ्यांचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. शहरांत प्रवेश बंदी करण्यात आलेल्या दारू विक्रेत्यांचा नगर पंचायत निवडणुकीतील राजकीय पक्षासह उमेदवाराचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतोच त्यामुळे सदर आदेश्याची अमल बजावणी करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!