सोनेगाव केळापूर मार्गावर अवैध मुरूम उत्खनन जोरात….

0

🔥महसूल विभाग कोमात,मुरम तस्कर जोमात.

🔥मुरूम तस्करांच्या वाहनांनी लावली सोनेगाव केळापूर मार्गाची वाट.

देवळी -/ तालुक्यातील सोनेगाव आबाजी जवळील सोनेगाव केळापूर मार्गावर अवैध मुरम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे मुरम तस्कर दररोज १०० ते १५० टिप्पर अवैध मुरमाचे उत्खनन करत आहे.तरी महसूल विभागाणे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मुरमाचे उत्खनन दीवस ढवळ्या होत असून सुद्धा महसूल विभागाला याची माहिती नाही का? त्यामुळे असे वाटते की महसूल विभाग कोमात आणि मुरम तस्कर जोमात असल्याचे दिसून येत आहे.             सोनेगाव केळापूर मार्गावर सी ए डी कॅमच्या डेमॉलेशन गेट जवळ दिवस ढवळ्या जेसीपी द्वारे दररोज मोठमोठ्या टिप्परने १०० ते १५० गाड्या चे अवैध मुरम उत्खनन सुरू आहे.त्यामुळे या मुरूम तस्कराच्या टिप्परने केळापूर सोनेगाव रोडावर मोठ मोठाले खड्डे पडले आहे त्यामुळे शेतकरी व अन्य लोक आपले चार चाकी व दुचाकी वाहने चालविणे कठीण झालेले आहे.सोनेगाव परिसरातील या अवैध मुरूम तस्कराच्या वाहनांनी त्रस्त झालेले आहे. परंतु महसूल विभाग याकडे डोळे झाकपणा का करीत आहे या अवैध मुरम तस्करावर थेट कारवाई करून यांच्या मुसक्या का आवरत नाही असा प्रश्न त्या भागातील नागरिक करीत आहे.                                           या संबंधित देवळी तहसील कार्यालयाच्या महसूल विभागात चौकशी केली असता महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने असे सांगितले की या भागामध्ये आम्ही मुरम उत्खनन करण्याची कोणतीच रीतसर परवानगी दिलेली नाही या सोनेगाव भागामध्ये काही भाग देवळी तालुक्यामध्ये येतो तर काही भाग हा वर्धा तालुक्यात जातो त्यामुळे येथे होत असलेल्या अवैध मुरूम उत्खननांची आम्हाला माहिती नाही तरी आम्ही याविषयी चौकशी करून कायदेशीर कारवाई करू असे त्यांनी सांगितले.महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अवैध मुरम उत्खनन करणाऱ्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहे.

                                    (क्रमशः)

सागर झोरे साहसिक news -24 देवळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!