🔥हार्वेस्टर चा धक्का लागल्याने दुचाकीवरील मागे बसणाऱ्या जागीच मृत्यू.🔥पोलिसात तक्रार घेण्यास पोलिसाचा नकार.
आष्टी शहीद -/ वाघोली येथून दोन व्यक्ती आष्टीला खाली सिलेंडर घेऊन येत असताना रस्त्यातच दुचाकीला अपघात झाल्याने यातील मागे बसणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला.
सविस्तर वृत्त असे की वाघोली येथील रहिवासी दुचाकी चालक राजेश पंडुले वय 27 वर्ष व किसन नागले वय 60वर्ष दोघेही दिनांक 30 मार्चला साडेदहा वाजता च्या दरम्यान दुचाकीने वाघोली वरून आष्टीला खाली सिलेंडर घेऊन येत असताना परसोडा नजीक भगवतीच्या फुलाजवळ यांच्या दुचाकी ला अपघात झाला. सदर अपघात येणाऱ्या हार्वेस्टर धक्का लागल्याने झाला असल्याची दुचाकी चालक सांगत आहे आहे. या अपघातात दुचाकी वरील मागे सिलेंडर घेऊन बसलेला किसन नागले वय 60 वर्ष याचा यात मृत्यू झाला तर राजेश पंडुले वय 27 वर्ष हा किरकोळ जखमी झाला. सदर घटनेची तक्रार करण्यास गेले असता आष्टी पोलिसांनी याबाबत कोणतीच तक्रार घेतली नाही. उलट सिलेंडर डोक्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे उपट सल्ला देऊन तक्रार घेण्यास नकार देऊन तक्रार करताना आल्या पावली परत केले. अपघाताची माहिती घटनास्थळी असणारे सांगू शकतात परंतु पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्ह्याची नोंद होऊ नये किंवा हार्वेस्टर चालकांकडून लक्ष्मीमेव जयते चे दर्शन व्हावे या उद्देशाने ठाणेदारच हार्वेस्टर चालकाला वाचवण्याच्या गोष्टी करत होते जसे की घटनास्थळावर ठाणेदार सह काही कर्मचारी हजर होते या सर्व वरून स्पष्ट होते की जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे राज्य गृहमंत्री असल्यामुळे कमीत कमी गुन्हे नोंद व्हावे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याची शाबाशी मिळावी किंवा लक्ष्मी व्यवस्थेच्या सहकार्याने पोलीस स्टेशन चालावे अशी भूमिका स्पष्ट दिसत आहे आष्टी पोलीस स्टेशन यांना कुणाच्या मृत्यूचेही काही सोयरसुतुक नाही. सर्वत्र गावात हार्वेस्टर चा धक्का लागल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची चर्चा असून या हार्वेस्टर चालकावर कोणताही गुन्हा दाखल करता प्रकरण मॅनेज करून चिरीमिरी घेऊन या अपघाताची खरी परिस्थिती दाबण्यात आल्याची सर्वत्र चर्चा आहे.