हिंगणघाट पोलिसाची देशी दारूच्या चारशे शिश्या आणऱ्यावर कारवाई…

0

हिंगणघाट / मुखबीरकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मा. वृश्टी जैन भा. पो. से. प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणचे पथकाने मुखबीरचे खबरेवरून शास्त्री वार्ड हिंगणघाट येथे नाकेबंदी करून नमुद आरोपीतांना पकडुन त्यांना पो. स्टाॅफचा व पंचाचा परिचय देवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) धिरज गजानन साळवे वय 19 वर्षे, 2) श्रीकंात बाबाराव डफ वय 24 वर्षे दोन्ही रा.शास्त्री वार्ड, हिंगणघाट असे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातील मोपेड गाडीची पाहणी केली असता आरोपीतांचे मोपेड गाडीवर 04 खर्डाचे खोक्यामध्ये प्रिमियम नं. 1 कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 400 शिश्या मिळुन आल्याने आरोपी क्र. 02 याचे घराची घरझडती घेतली असता आरोपी क्र. 2 याचे घरामध्ये 04 खर्डाचे खोक्यामध्ये प्रिमियम नं. 1 कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 400 शिश्या असा एकुण 800 शिश्या प्रती शिशी 100/- रू. प्रमाणे 80,000/- रू. व मोपेड गाडी क्र. एम एच 32 ए यु. 0571 जुनि वपरती अंदाजे किं. 70,000/-रू असा एकुण जु. किं. 1,50,000/- रू. चा माल मिळुन आल्याने सदरचा माल मौका जप्ती पंचनाम्या प्रमाणे जप्त करून नमुद आरोपीतंाविरूध्द गुन्हा नेांद करून तपासात घेतला.
सदरची कारवाई मा. नुरूल हसन सा. पोलीस अधिक्षक वर्धा, मा. डाॅ. सागर कवडे सा. अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. रोशण पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात मा. वृश्टी जैन भा. पो. से. प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेषन हिंगणघाट यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. हवा. प्रविण देषमुख, सुनिल मळणकर, पो. ना. नितीन ताराचंदी, नरेंद्र आरेकर, पो.शि. विजय हारनुर यांनी केली आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज /24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!