हिंगणघाट येथे ईद-उल-फितरचा सण अत्यंत आनंद, उत्साह आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला

0

🔥हिंगणघाट येथे ईद-उल-फितरचा सण अत्यंत आनंद, उत्साह आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

🔥रमजानच्या पवित्र महिन्याचे पूर्ण 30 रोजे ठेवल्यानंतर जसेच शव्वालचा चंद्र दिसला, तसे संपूर्ण शहरात आनंदाची लहर पसरली.

हिंगणघाट -/ सकाळी निशानपुरा ईदगाह येथे 8 वाजता मौलाना हाफिज मुशाहीद रजा, टाॅका ग्राउंड ईदगाह येथे हजारोंच्या संख्येने नमाजदारांनी एकत्र येऊन ईदची नमाज अदा केली. नमाजपूर्वी जामा मशिदीचे हाफिज मौलाना साबीर हुसेन, साहेबांनी तकरी, (भाषण) व नमाज पाटण करुन ज्यामध्ये रमजानचे महत्त्व, मानवता, जकात आणि गरजूंना मदत करण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला. आणि देशात शांतता, सौहार्द भाईचाऱ्यासाठी विशेष दुआ व प्रार्थना केली.
नमाजानंतर लोकांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि “ईद मुबारक”च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. या प्रसंगी मुलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला, जिथे नवीन कपडे परिधान करून त्यांनी ईदीचा आनंद घेतला. शहरातील मान्यवरांनी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड, सुधीरबाबु कोठारी, माजी आमदार राजूभाऊ टिमांडे, बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाकडून सतीश ढोबे, मनीष देवळे, राजू खुपसरे व अनेक कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिले,
ईदच्या या पवित्र प्रसंगी शहरात सुरक्षेचेही पुख्ता बंदोबस्त करण्यात आले होते. पोलीस प्रशासन कडून उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील नायक, ठाणेदार अनिल राऊत यांच्या कळून सुरक्षेचा पूर्णतः सतर्क दिसत होती, ज्यामुळे नमाज आणि सण शांततेत पार पडला.
यासोबतच मुस्लिम समाजातील लोकांनी समाजात भाईचारा, एकता आणि परस्पर सौहार्द टिकवून ठेवण्याचा संदेश दिला. अनेक ठिकाणी गरीब आणि गरजू लोकांना फित्रा आणि जकात वाटप करण्यात आले, जे या सणाची विशेष परंपरा मानली जाते.
एकंदरीत, हिंगणघाट येथे ईद-उल-फितरचा सण परस्पर प्रेम, सौहार्द आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

         ईकबाल पहेलवान                साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!