हिंगणघाट MIDC तील आगीने केली नियमबाह्य कारभाराची पोलखोल; राज्यभर चौकशीची मागणी….

0

🔥हिंगणघाट MIDC तील आगीने केली नियमबाह्य कारभाराची पोलखोल; राज्यभर चौकशीची मागणी

हिंगणघाट -/ हिंगणघाट येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरातील भंगार गोडाऊनला लागलेल्या आगीच्या घटनेने औद्योगिक क्षेत्रातील नियमबाह्य कारभाराची पोलखोल झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या MIDC परिसरात प्रत्यक्ष उद्योगधंद्यांऐवजी भंगार व्यवसाय, मोठमोठी गोडाऊन आणि इतर अनधिकृत उपक्रम सुरू असल्याचे समोर येत आहे.
या घटनेमुळे अग्निसुरक्षा, पर्यावरणीय परवानग्या, बांधकाम नियम आणि भूखंडांच्या वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित व्यवसायांना परवानगी देताना कोणते निकष तपासले गेले, तसेच नियमांचे उल्लंघन झाले असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याबाबत नागरिकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, ही बाब केवळ हिंगणघाटपुरती मर्यादित नसून राज्यातील इतर MIDC क्षेत्रांमध्येही अशाच प्रकारे नियमबाह्य व्यवसाय सुरू आहेत का, याची सर्वंकष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. औद्योगिक भूखंडांचा मूळ उद्देश बदलून अन्य व्यावसायिक वापर होत असल्यास, हा गंभीर प्रशासनिक मुद्दा असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सरकारने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व MIDC क्षेत्रांचा आढावा घ्यावा, नियमबाह्य आस्थापनांवर कठोर कारवाई करावी आणि जबाबदारी निश्चित करून पारदर्शक अहवाल जाहीर करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

          ईकबाल पहेलवान                साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!