अंतुर्लीत मुक्ताई दिवाळी कर्तुत्व माहेरचे कार्यक्रमाचे आयोजन
मुक्ताईनगर / पंकज तायडे
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील माणिकराव शंकरराव पाटील यांची सुकन्या सूर्योदय महिला उद्योग बहुद्देशीय मंडळ तेल्हारा च्या संचालिका दीपिका प्रकाश देशमुख यांनी मुक्ताई दिवाळी कर्तव्य माहेराचे या कार्यक्रमाचे आयोजन केले, प्रथम महिलांना घरेलू उद्योगा विषयी मोफत व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात आले, नंतर या कार्यक्रमामध्ये सर्व समाजातील ४० विधवा महिलाना साडी, चोळी व काहींना कपडे वाटप करण्यात आले तसेच कोरोणाच्या बिकट परिस्थितीत जीवाची परवा न करता उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य विभागातील महिलांना ,अंगणवाडी सेविका, महिला बचत गट,आशा वर्कर यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचे सत्कार दीपिका देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. समाजात विधवा महिलांचा पण सत्कार झाला पाहिजे प्रत्येक महिला स्वावलंबी झाली पाहिजे या उद्देशाने दीपिका देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जपून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील मा.फ. दा. अध्यक्ष विनोद तराळ, ज्ञानोदय मंडळ अध्यक्ष एस ए भोईसर, माजी सरपंच शरद महाजन ,सरपंच सुलभा शिरतुरे, उपसरपंच गणेश तराळ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. व असा सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल दीपिका देशमुख यांचे कौतुक केले.तसेच पत्रकार संघाच्या वतीने देखील दीपिका देशमुख यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार जया भारती ( इंगोले ) अकोला, यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीते साठी दीपिका देशमुख व अकोला तेल्हारा येथील सूर्योदय महिला बहुउद्देशीय संस्था च्या सर्व महिलानी परिश्रम घेतले .