🔥अंतोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचा उपक्रम.
आष्टी शहीद -/ येथुन नजीकच असलेल्या अंतोरा येथे जगदंबा स्पोर्टींग क्लब माणिकनगर व छत्रपती शिवाजी महाराज फॉउंडेशन अंतोरा यांच्या उपक्रमातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि. 19फेब्रुवारी पासून शिवजयंती दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक महोत्सव सोबतच आमदार चषक कबड्डी स्पर्धा सुध्दा आयोजित करण्यात आल्या आहे.अंतोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन अंतोरा यांचा दरवर्षी शिवजयंती कार्यक्रम मोठया उत्सहात साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे याही वर्षी दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनाचे निमित्त साधून आमदार चषक कब्बड्डी स्पर्धा पुरुष गटातील साठ किलो वजनात या कब्बड्डी संघ खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेकारिता प्रथम बक्षीस 33333/ रूपये मुरहुम हाजी शेख गफ्फार शेख रहेमान यांचे समूती प्रित्यर्थ हाजी शेक जमील भाई यांचे तर्फे, तर दुसरे बक्षीस 22222/- रूपये स्व. श्री. वासुदेवराव देशमुख स्मृती प्रित्यर्थ एम. व्ही. डी .एस. असोसिएशन प्रा. ली. अमरावती यांचे तर्फे, तर तिसरे बक्षीस 11111/- रूपये स्व. श्री. गणेशराव कुरवाडे यांचे समूति प्रित्यर्थ प्रल्हाद कुरवाडे यांचे तर्फे.हनुमान मंदिर अंतोरा येथे कब्बड्डी सामने घेतल्या जाईल. सकाळी ५.३० ते ७.३० ग्रामस्वछता अभियान, सकाळी ९.०० ते २.०० भव्य शोभयात्रा, दुपारी २.०० ते ३.०० वाजता भजन मंडळ बक्षीस वितरण आणि हळदीकुंकू. ५.०० वाजता पथनाट्य, सायंकाळी ६.०० वाजता आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते हनुमान मंदिर सांभागुहाचे लोकार्पण सोहळा होईल.सायंकाळी ६.०० वाजता कबड्डी स्पर्धेचे उदघाटन व लगेंच शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम होईल यावेळी महाराष्ट्राची लोकप्रिय नूत्यकाला अभिनेत्री जान्हवी मुंबईकर व संच सादर करतील. माजी आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षते खाली व मुख्य अतिथी मकरंददादा देशमुख आणि जमील भाई शेख यांच्या सोबत नवनिर्वाचित आमदार व सत्कार मुर्ती विद्यमान आमदार सुमितदादा वानखेडे हे व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे कार्यक्रमाचे आयोजक राजेश ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.