🔥अकराव्या वर्गात शिकणारा नयन कामडी वय १६ वर्ष रा.थार गळफास घेऊन संपविले जीवन.
🔥करोला शेत शिवारात घडली घटना,थार गाव हळहळले…
आष्टी शहीद -/तालुक्यातील थार येथील नयन प्रवीण कामडी वय १६ वर्ष हा लोकमान्य महाविद्यालय आष्टी येथे ११ व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या व आई वडिलांना येकुलता एक अश्या या अल्पवईन मुलाने थार गावाच्या करोला शेत शिवारात सागाच्या झाडाला गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना दि.२० रोजी रात्री ११.४५ वाजता उजेडात येताच एकच खळबळ उडाली. अल्पवईन मुलाच्या आत्महत्ये ची वार्ता गावात येताच हळहळ व्यक्त होत होती.
सविस्तर असे कि,
थार गावातील शेतकरी प्रवीण कामडी यांना दोन मुले होती. त्यातील नयन हा आई वडिलांचा येकुलता एक लाडका मुलगा होता. शिक्षणात हुशार असल्यामुळे त्याला आष्टी येथील लोकमान्य महाविद्यालय येथे तो अकरावीला शिक्षण घेत होता. हसऱ्या स्वभावाचा, हुशार, कब्बड्डी व कला क्षेत्रात तो हिरीरीने भाग घेत असत. दि. २० रोजी सायंकाळी ५ वाजता तो घरंच्या शेताच्या दिशेने करोला या शेत शिवारात गेला होता. सायंकाळी दहा वाजले तरी तो घरी जेवण करायला आला नाही म्हणून फोन वरून शोध सुरु झाला. फोन ची रिंग वाजत असली तरी प्रतिसाद देत नव्हता म्हणून वडील प्रवीण आणि नातेवाईक यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली असतात ११ वाजून ४५ मिनिटांनी एका सागाच्या झाडाला मूतदेह लटकलेला दिसला. या घटनेची माहिती आष्टी पोलिसांना देण्यात आली. आष्टी पोलीस घटना स्तळी पोहचली पंचनामा करून मूतदेह आर्वी उपजिल्हा रुग्णालय येथे उत्तरीय तपासणी करिता पाठविला. अल्पवईन मुलाच्या मृत्यूने थार गाव हळहळ व्यक्त करीत आहे.आत्महत्या करण्यामागे नेमके कारण काय हे मात्र अदयापही कळू शकले नाही.पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.