🔥शहरातील बीजेपी चे महामंत्री दिनेश वर्मा बीजेपी कार्यकर्ता मुन्ना त्रिवेदी व इतर यांच्यावर कारवाईची मागणी केली.
हिंगणघाट -/अखिल भारतीय मराठा महासंघ व शहरातील नागरिकांकडून घटनेचा निषेध करत घटनेतील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली शहरातील जिल्हा न्यायालयासमोर वैशाली पालांडे यांच्या दुकानावर आरोपीकडून दुकानाची तोडफोड करून दरोडा घालण्याचे कृत्य करण्यात आले
यामध्ये बीजेपीच्या महामंत्री दिनेश वर्मा मुन्ना त्रिवेदी व इतर यांनी खुलेआम गुंडागिरी करत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
यासंदर्भात गुन्हेगारावर कुठलीही कारवाई न करता पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणात एन सी मॅटर करण्यात आले
याचाच उद्रेक म्हणून शहरातील सामाजिक संघटना व नागरिक यांनी आज हिंगणघाट शहरात या गुंडाच्या विरोधात आक्रोश केला असून केलेल्या कृत्याचा निषेध करीत शिवाजी पार्क येथून मराठा महासंघ मोर्चा काढुन घटनेचा निषेध करण्यात आला या घटनेमुळे शहरात शांतता व सुव्यवस्था याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून बीजेपीच्या गुंडावर कारवाईची मागणी करण्यात आली.
ही घटना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झाल्यानंतर पोलिसांकडून योग्य कारवाई न केल्याने
पोलीस प्रशासन कुठल्यातरी दबावात या गुंडावर कारवाई करण्याकरिता घाबरत तर नाही आहे . अशी चर्चा सुद्धा हिंगणघाट शहरात होऊ लागली
पोलीस प्रशासन गुंडांना पाठीशी असल्याचे प्रयत्न करत असून घटनेच्या वेळी योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली असती तर असा आक्रोश शहरात निर्माण झाला नसता अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या असून बीजेपीच्या या गुंडावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.
शहरात आक्रोश निर्माण झाला असून वैशाली पालांडे यांच्या समर्थनात मराठा समाज आक्रोशीत झाला असून सामाजिक संघटना व नागरिकांनी आज आरोपींवर कायद्यातील योग्य गुन्हे नोंद करून कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.