देवळी -/ येथील साबाजी स्पोर्टस असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामसुंदर अग्रवाल यांच्या स्मृती दिनानिमीत्य ३० सप्टेंबर व १ ऑक्टोंबर सोमवार व मंगळवार ला सायंकाळी ८.३० वाजतां श्यामसुंदर मन्नालाल धर्मशाळेच्या सभागृहात व्दिदिवसीय व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर व्याख्यानमाला श्रोत्यांसाठी बौध्दिक विकासाचे व्यासपीठ असुन ही व्याख्यानमाला देवळी सारख्या लहान शहरात ३९ वर्षापासुन सतत सुरु असुन या निमीत्ताने अनेक नामवंत कवी व साहित्यिकांचा यात सहभाग राहिला आहे. व श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावर्षी सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे नामांकीत साहित्यिक व कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर नागपुर हे दर्जेदार मराठी गझल व कविता व्दारे प्रथप पुष्प गुंफणार आहे. कवितेचा विषय ” सखे साजणी ” हा असुन या प्रसंगी विदर्भ साहित्त्य संघाचे अध्यक्ष प्रदिप दाते अध्यक्षस्थानी राहतील. मंळवार १ ऑक्टोंबरला कुरुडवाडी संत सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयंत करंदीकर (सोलापुर) यांचे ” सुखी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर व्याख्यान होईल. या प्रसंगी माजी खासदार रामदास तडस हे अध्यक्षस्थान भुषवतील. या कार्यक्रमात देवळी शहरातुन १० वी १२ वीत परिक्षेत सर्व प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला गायत्रीदेवी मोहनलाल अग्रवाल व अशोक शामसुंदर अग्रवाल स्मृतीपित्यर्थ विज्ञान, कला व वाणिज्य पदवी परिक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशिस्त पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.तसेच साबाजी स्पोर्टसचे अध्यक्ष मोहन अग्रवाल यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.