🔥अचानक पंचरमुळे कार पलटी; हिंगणघाटजवळ मोठा अपघात टळला.
हिंगणघाट -/राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर हिंगणघाट शिवारात बुधवारी (दि.२२) सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास अचानक वाहनाचे टायर पंचर झाल्याने चालकाने जोरात ब्रेक मारला. यामुळे कार रस्त्याखाली घसरून पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हिंगणघाट येथील रहिवासी जनार्धन नानाजी महाजन (वय ५९) हे आपल्या कार क्रमांक MH 32 AX 4154 ने श्रीकांत नामदेव पवाने (वय ५७) यांच्यासह हिंगणघाट ते कुटकी-वडनेर मार्गाने जात होते. वणा नदीजवळ अचानक टायर पंचर झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याखाली जाऊन पलटी झाली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच PSI तोडासे, ASI व पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून हा बिना दुखापतीचा अपघात असल्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे देण्यात आली असून वाहतूक काही काळानंतर सुरळीत करण्यात आली.