हिंगणा -/येथे सामाजिक उत्तरदायित्वातून कार्य करणाऱ्या कृतीशील शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रोटरी क्लब च्या वतीने नेशन बिल्डर अवॉर्ड देण्यात येतो. कल्पतरू शिक्षण व सामाजिक, सांस्कृतिक नागपूर द्वारा संचालित हिंगणा येथील स्वर्गीय शामराव देशमुख स्मृती विद्यामंदिर या शाळेत कार्यरत असणारे अतुल बोबडे यांना शालेय विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत, तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी चे विविध उपक्रम,सी एस आर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे, सांस्कृतिक आयोजन, युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा आणि शिबिरांचे आयोजन अतुल बोबडे करत असतात. पुरस्कार व्यक्तीला त्याच्या जबाबदारी बद्दल तीव्र जाणीव करून देत असतात. प्रेरणा देत असतात असे मत पुरस्कार स्वीकारताना अतुल बोबडे यांनी व्यक्त केले.