वर्धा -/अमरावती येथे १५ डिसेंबर रोजी वधु-वर परिचय मेळावा संपन्न झाला.त्यावेळी सन्मानिय माजी खासदार सुरेशजी वाघमारे, आदरणीय माजी पालकमंत्री अमरावती जगदिशजी गुप्ता,संस्थेचे अध्यक्ष किशोरजी जीरापुरे तथा सन्मानिय पदाधिकारी यांच्या हस्ते संताजी अखिल तेली समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा संस्थापक.अनिल बजाईत तथा अविनाश टाके यांचा सामाजिक कार्यासाठी समाजभुषण म्हणुन सत्कार करण्यात आला.प्रदेश उपाध्यक्ष अविनाश टाके तथा वरीष्ठ पदाधिकारी अरुणराव कहारे सर प्राध्यापक सुरेन्द्र गोठाणे,सुरक्षा समितीचे अध्यक्ष भरत जैसिगपुरे,मोरेश्वर नरड,सामाजिक कार्यकर्ती.निलिमा सु.गोठाणे ताई व.वैशाली अ.बजाईत आवर्जून उपस्थित होत्या.