🔥आर्वी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान प्रकरण आले उघडकीस.
आष्टी शहीद -/ शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी येथील एक रहिवासी लग्न झालेली अल्पवयीन मुलगी उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे प्रस्तुती करण्यास गेली असता ती अल्पवयीन असल्याचे आढळल्याने या मुलीच्या पतीवर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की आष्टी येथील इंदिरानगर रहिवासी रवींद्र सोनवणे वय 26 याने इंदिरानगर मध्येच राहणारे अल्पवयीन मुलीशी लग्न केले त्यादरम्यान मुलगी गरोदर असल्याने तिला प्रसुती करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे नेण्यात आले. प्रसुती दरम्यान आवश्यक कागदपत्रे तपासले असता या मुलीचे वय 17 वर्षे सहा महिने असल्याने उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टरने याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी कार्यालय आर्वी येथील पोस्को सेल च्या अधिकाऱ्यांना माहिती दिली माहिती देताच पोलिसांनी चौकशी करून मुलीच्या नवऱ्याला आरोपी करून रवींद्र सोनवणे याला अटक केली दरम्यान यावर 376, पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलीत असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक मंडवाले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय करीत आहे.