अवैध रेती तस्करांचा आपसात वाद : मारहाण केल्याची तक्रार
तालुका प्रतिनिधी / राळेगांव :
राळेगांव तालुक्यात अवैध रेती तस्करी ऐरणीवर आली आहे. रेती चोरटयाची दिवसे दिवस दादागीरी सामान्य नागरी का सह प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे.
दिनांक १९ डिसेंबरच्या रात्री वनोजा येथील प्रकाश काचोळे मनोज येणोरकर हे राळेगांवला काही कामानिमित्त आले . परत जातांना जेवणाचा बेत आखला टर्निंग पॉईन्ट बार रेस्टॉरेन्ट वर जेवण करायला काचोळे येणोरकर यांच्या सोबत दोन तलाठी होते दोघा कडे नदीच्या पात्राच्या बाजूची गावे आहे . जेवण करतांना अचाणक गौरव जिद्देवार हा आला व पैशाच्या विषयावरून वाद झाला लगेच दहा ते पंधरा लोक आले त्यांनी मारहाण केली या संदर्भात प्रकाश तानबांजी काचोळे यांनी राळेगांव पोलीस स्टेशनला तक्रार दिली यात गौरव जिद्देवार गजानन गजबे गजू राउत यांच्या नावाने तक्रार मारहाण केल्याची तक्रार दिली राळेगाव पोलीस स्टेशनचे जमादार बावणे रात्रीला उपस्थीत होते . त्यांनी प्रकरण तपासात आहे असे सांगीतले रेती चोरटया च्या आपसी वादा ला सुरवात झाली असून रेती मधून मिळणारा अमाप पैसा या तून आलेली मग्रुरी प्रशासनाला आम्ही खिशात घेवून फिरतो यामुळे आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही. असे या अवैध रेती तस्करी करणाऱ्याना वाटते रेती चोरटया नां वाटते . त्यांचे हे बोलणे योग्य आहे कारण, महसूल विभाग विभागातील बड्या अधिकाऱ्यांपासून तर आठवड्या पर्यंत सर्वांच्या खिशात रेती तस्करी करणारे लक्ष्मी पोहोचवतात तर मग ते कारवाई कसे करणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी साहेब आता तरी या अवैध रेती तस्करी करणाऱ्यांना आळा घाला अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.