वर्धा -/आंजनगाव ते सुकळी उभार रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांचा जीवघेना प्रवास सुरूच असून दळण वळण करणे जोखमीचे झाले आहे.मात्र,येथील समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं आहे काय?असा प्रश्न उद्भवला जात आहे.परिसरात येणारी लालापरिही बंद करण्यात आली. असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे बोलल्या जाते.बऱ्याच दिवसापासून बस फेऱ्या बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून लहान वाहन चालक जीव मुठीत धरून या वाटेने प्रवास करताना आढळते. मात्र,अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अखेर ग्रापंचायत पिंपळगाव (भोसले) येथील सरपंच, सदस्य व ग्रामस्थांकडून २९ जुलै रोजी ठराव संमत करून कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना वर्धा यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात पुल, रोड दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी.नागरिकांना ये जा करण्यासाठी मार्ग मोकळा करावा.प्रवासात अडचण येत असल्यास काम बंद करण्यात यावे.बस सेवा सुरू करण्यात यावी. बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास, अप्रिय घटनेस शासन जबाबदार राहील.असे निवेदन देण्यात आले आहे. मात्र,शासनाकडून गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.