आज संभाजी ब्रिगेडचा जाहीर कार्यकर्ता मेळावा,मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार….

0

 वर्धा -/ संभाजी ब्रिगेड वर्धा जिल्ह्याच्या वतीने इंजि.तुषार उमाळे यांच्या नेतृत्वाखाली आज.७ ऑगस्ट रोजी स्थानिक अनुसया मंगल कार्यालय,नालवाडी येथे स.११:३० वा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे हे असतील.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील प्रसिध्द वक्ते,विचारवंत प्रा.डॉ.दिलीप चौधरी व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे असतील.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष (दक्षिण विभाग) अतुल शेंदरे,जिल्हाध्यक्ष (उत्तर विभाग) प्रफुल क्षीरसागर, महिला आघाडी अध्यक्ष अनिता येवले,वर्धा तालुका अध्यक्ष प्रवीण ढाले,तसेच विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून म.से.संघाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष राजू वानखडे,जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्यकारणी सदस्य योगिता इंगळे, जिजाऊ ब्रिगेड वर्धा जिल्हाध्यक्ष अर्चना जगताप व वर्धा जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडचे शेकडो पदाधिकारी ,व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.संभाजी ब्रिगेडने मागील ३२ वर्षांपासून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव काम केले असून महाराष्ट्रातील तरुणांमध्ये पुरोगामी विचार रुजविण्याचे काम अत्यंत ताकदीने केलेले आहे.महाराष्ट्रातील सांस्कृतिक दहशतवाद मोडून काढण्यासाठी संभाजी ब्रिगेडने मागील ३२ वर्षांपासून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेसोबत संघर्ष केला आहे.आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकारणात देखील उतरली असून येणाऱ्या विधानसभेची निवडणूक संभाजी ब्रिगेड अत्यंत ताकदीने लढणार आहे व त्याबाबतची भूमिकाच या मेळाव्यामधून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे स्पष्ट करणार आहे.या मेळाव्याला संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे वर्धा जिल्हा प्रवक्ते मिलिंद ढेवले यांनी केले आहे.

गजेंद्र डोंगरे साहसिक news -24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!