आदर्श महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन; या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे डोळेही पाणावले
प्रतिनिधी/वर्धा
स्थानिक हरिराम भूत आदर्श कला कनिष्ठ महाविद्यालयात 18 वर्षांपूर्वी च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा तसेच गुरुजन सत्कार सोहळा आयोजित केला गेला. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षण प्रचारक सभेचे सहसचिव प्रमोद लुंकड, प्रमुख उपस्थिती विद्यालयाचे प्राचार्य संजय दुबे, उपप्राचार्य लोखंडे तसेच सत्कारमूर्ती माजी प्राचार्य श्याम देशपांडे, संतोष तिवारी व प्राध्यापक राजेश बोरकर उपस्थित होते.
स्नेहमीलनाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. याच वेळी अकाळी निधन झालेल्या रीना धांदे, मंजुश्री जामखुटे व नितीन बेताल या वर्गमित्रांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. अश्विनी भागत, स्मिता कांबळे व किरण पाचोडे यांनी शब्दसुमणांनी तसेच पाहुण्यांचे व समस्त उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर या माजी विद्यार्थ्यांना शिकवलेल्या शिक्षकांमध्ये राजेश बोरकर तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्याम देशपांडे, संतोष तिवारी, तसेच संस्थेचे सहसचिव लुंकड व संजय दुबे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच वर्गमैत्रीण बी.एस.एफ ची जवान छाया येरमे यांचाही सत्कार करण्यात आला. शाळेच्या ऋणाची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्याकडून एल.इ.डी टीव्ही शाळेसाठी भेट देण्यात आली.. तसेच शाळेच्या मातीशी या विद्यार्थ्यांची नाळ नेहमीच जोडली राहावी यासाठी तेथून दरवर्षी इयत्ता बारावीत प्रथम येणाऱ्या विध्यार्थ्यास 1001 रु. बक्षीस जाहीर करून ही रक्कम प्राचार्य दुबे सर यांना सुपूर्द करण्यात आली.
समाज वृणाची ची भावना मनात ठेऊन या विद्यार्थ्याकडून आकस्मित मृत्यू झालेल्या वर्ग मित्रांच्या परिवाराला 5000 रु. सानुग्रह निधी पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यानंतर 18 वर्ष्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात आलेल्या सर्व मित्र मैत्रिणींनी महाविद्यालयातील गोड आठवणींना उजाळा दिला. व शाळेतील जुने प्रसंग आठवल्याने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले तसेच आपल्या माजी विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहून शिक्षकांना सुद्धा गहिवरून आले. व मुलींनी माहेरी आल्याचा भास होतोय हे सांगतांना काहींचा कंठ दाटून आला. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद लुंकड यांनी कार्यक्रमाला सुंदर आयोजनाचे व समाज ऋणाची भावना रुजवणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापक श्याम देशपांडे, प्राध्यापक संतोष तिवारी, प्राध्यापक राजेश बोरकर, या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यात. सत्कार मूर्ती श्याम देशपांडे यांनी 18 वर्षांपूर्वी विद्यार्थी कोण, कसे होते हे सांगत कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी घेणाऱ्या सचिन मेश्राम व कृष्णा राऊत या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संतोष तिवारी यांनी तत्कालीन शिस्तीचे व मानवाच्या जीवनात कसे फायदे होतात हे सांगून पुढे ही सर्वांनी सिस्थीतच राहावे असा उपदेश दिला. राजेश बोरकर यांनी एसटीचा संप असतानाही विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणातील उपस्थिती बद्दल कौतुक करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य दुबे यांनी विद्यार्थ्यांना हे विद्यालय तुमचेच असून तुम्ही कोणतेही चांगले उपक्रम येथे राबवू शकता असे आपले पणाचे शब्द सांगून इतरही माजी विद्यार्थ्यांनी असे कार्यक्रम करून बालपणाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले. भोजनानंतर सर्व जुन्या वर्गमित्रांनी आपल्या जुन्या बारावीच्या वर्ग खोलीत जाऊन गप्पा-गोष्टी मस्ती गीत गायन नाचणे यातून बालपणीचा आनंद लुटला. या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप देणाऱ्या शेवटी जड अंतकरणाने गोड मिठाई वाटून कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मेश्राम व माधुरी बीरे, ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद गेडाम यांनी केले यावेळी कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थी वर्ष 2001 ते 2003 सह शालेय शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राचार्य दुबे,प्राध्यापक बोरकर यांनी मार्गदर्शन केले तर सचिन मेश्राम कृष्णा राऊत, सचिन दारोकर, प्रियंका ढोमणे निनावे, स्मिता कांबळे, अजय होटे, चंचल उके, अरविंद गेडाम, रूपाली बोकडे, किरण पाचोडे, दुर्गेश यादव, माधुरी बीरे, रोशनी भलमे, पूनम राऊत,स्नेहल हरणे,वृंदा नासरे, दुर्गेश यादव यांनी मोलाची कामगिरी बजावली…