आदिवासी गोंड गोवारी जमातींचा सर्व पक्षीय नेत्यांना निवेदन देऊन आंदोलन चा इशारा…..

0

🔥खासदार अमर काळे,लोकसभा प्रमुख सुमित वानखडे,आमदार दादाराव केचे यांना निवेदन सादर.🔥सेवानिवृत्त न्या के एल वडणे यांच्या अध्यक्षतेखाली गोंड गोवारी अभ्यास समितीचा मुदतवाढ रद्द करणे अन्यथा आंदोलन.

आष्टी शहीद -/ शासनाच्या अन्यायकारी धोरणाचा फटका गोंड गोवारी समाजाला आला बसत आहे मागील ७० वर्षापासून समाज संविधानिक मार्गाने लढा देत आहे २६ जानेवारी २०२४ रोजी आदिवासी गोंड गोवारी कृती समितीतर्फे आमरण उपोषण करण्यात आले आंदोलनाची दखल घेऊन १० फेब्रुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोंड आदिवासी जमातीचा अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती एलके वडणे समिती नेमली समितीला सहा महिन्याचा आत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या परंतु समितीने अद्याप अहवाल सादर केला नाही परंतु आदिवासी विभागाने षडयंत्र करून दोन महिने मुदत वाढवली यामुळे आदिवासी गोंड गोवारी जमातीत असंतोष निर्माण झाला आहे लवकरात लवकर जीआर रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दीपक सायरे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी गोंड गोवारी समाज यांनी दिला
यावेळी वासुदेव ठाकरे महिला व बालकल्याण सभापती मधुमाला दुधकवरे, आष्टी तालुका अध्यक्ष अशोक मोगरे,पंकज दुधकवरे,रवी ठाकरे,माया चौधरी,शंकर सोनवणे, माणिक कोहळे,दिनेश दूधकवरे, अंबादास मोगरे,राहुल भारसाकरे, नंदकिशोर शेंद्रे,भीमराव नागोसे, रोशन शेंद्रे, लता शेंद्रे, ऋषभ ठाकरे, विकास मोगरे, राहुल भारसाकरे, दिपाली नेहारे, यासह आष्टी आर्वी कारंजा तालुक्यातील गोंड गवारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नरेश भार्गव साहसिक news -24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!