🔥आधार कार्ड केंद्रावर नवीन आधारकार्ड काढणे किंवा जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी द्यावे लागते अतिरिक्त पैसे.
समुद्रपूर -/शहरात आधारकार्ड केंद्रावर नवीन आधारकार्ड काढणे किंवा जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे. मात्र, त्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असून त्याची पावती मात्र दिली जात नाही आधारकार्ड काढणे,जुन्या कार्डमधील नावात,पत्त्यात दुरुस्ती करणे आदी कामांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये,यासाठी संबंधित कंपनीला आधारकार्ड केंद्र सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.नागरिकांच्या सोयीसाठी या केंद्रावरून आधारकार्डसंबंधी सेवा होणे अपेक्षित आहे.परंतु,कामानुसार जास्तीचे पैसे घेतले जात असून त्याची पावती दिली जात नाही,याशिवाय केलेल्या कार्डच्या दुरुस्तीचे प्रिंटही दिले जात नसल्याची तक्रार येते आहे.आधार केंद्रावर बऱ्याच दिवसापासून अवैध वसुली केल्याची तक्रार समोर येत आहे परंतु याकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही आधार कार्ड केंद्रावर ग्राहकांकडून नियमाविरुद्ध पैसे वसूल केले जात आहेत.सरकारी नियमानुसार आधार कार्ड केंद्रावर दर यादीही चिकटवण्यात आलेली नाही.विशेष म्हणजे नवीन आधारकार्ड बनवणे आणि आधार दुरुस्त करणे यासाठी आधार केंद्र उघडण्यात आले असले तरी येथे नियमानुसार काम केले जात नाही.आधार कार्ड बनवण्यासाठी लोकांकडून २०० रुपये आकारले जात आहेत.ग्रामीण भागातील लोक ३ ते १० किमी अंतर कापून ग्रामीण केंद्रावर येत आहेत.दुसरीकडे आधार केंद्रही मनमानी पद्धतीने सुरू केले जात आहे. ग्राहकांना पैशांच्या पावत्याही दिल्या जात नाहीत.अशा परिस्थितीत लोक चिंतेत आहेत. (क्रमशः)