वर्धा -/मानवतेचे महा पुजारी वं.राष्टूसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचार कार्याचे प्रचारक आध्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलुरकर याचा ९४ वा जयंती महोत्सव गोकुळ अष्टमी महोत्सव श्रीक्षेत्र वरखेङ येथे दिनांक २६ व २७ ऑगस्ट ला विविध रचनात्मक कार्याने संपन्न होत आहेत. १९३० ला गोकुळ अष्टमी ला त्याचां जन्म झाला. वं.राष्टूसंत श्री तुकडोजी महाराजाच्या मातोश्री पुज्य मंजुळा माता यांनी दादाचे रामकृष्णा नामकरण केले वं.राष्टूसंताचा सहवास लाभलेले रामकृष्ण दादा पुढे ग्रामगीता प्रचार कार्यात आले. स्वता वं.राष्टूसंत श्री तुकडोजी महाराजानी त्याना ग्रामगीताचार्य हि पदवी पहिल्यांदा घोषित केली. उद्या दिनांक २६ ला सामुदायिक प्रार्थना व चिंतन श्री प्रमोदजी पोकळे याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे, राञी ९ ते १२ इंजिनिअर ग्रामगीता प्रबोधनकार श्री दिनकर चोरे वरखेङकर यांच्या किर्तना चा कार्यक्रम संपन्न होईल दिनांक २७ ला प्रभाती समर्थ आडकुजी महाराज याच्या महासमाधीला अभिषेक व पुज्य मंजुळा माता स्मारक परीसर व स्मशानभूमी परीसरात वूर्क्षारोपन तसेच गुणवंत विध्याथी व ग्रामगीता प्रचार कार्यात योगदान देणाऱ्या कार्य कर्त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अखील भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्षमनराव गये दादा याच्या प्रमुख उपस्थितीत बाळ पदवाड,गुलाबराव उके दादा, भा, रा, बेलुरकर याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भंते अभयनायक,अमोल बाबंल ,श्री बाळासाहेब वाट, बाबारावजी गेडाम राळेगाव,गोविंद ठवळी टाकरखेड, सुधाकर वाढोनकर,गजेंद्र धजेकर सो,मायाताई साहेबराव नादुरंकर, पंडितराव हनुमानजी सातपुते, गंगाधर वानखडे,खडका,डॉक्टर,राजेंद्र गगने,अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गये दादा याच्या पंच्याहत्तरी निमीत्य विशेष सोहळा संपन्न होत आहेत,या पुज्य दादाच्या जयंती महोत्सवा ला गुरुदेव सेवकानी उपस्थितीत राहण्याचे आवाहन आध्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा विचार प्रतिष्ठान चे अध्यक्ष बाळासाहेब पदवाड यानी केले आहे.