आपण निसर्गाचे देणे लागतो याचे भान ठेवा,जॅकी श्रॉफ…..

0

🔥व्यंकटेश जोशी, सीमा सिंग, वैभव वानखडे, डॉ. विजय दहिफळे, शिवाजी बनकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ तर, दिलीप वैद्य, सुरज कदम, संदीप खडेकर, बाळासो पाटील, वृषाली पाटील यांना जर्नालिझम अवॉर्ड प्रदान 🔥लोककल्याणासाठी पत्रकारितेचा आग्रह धरा,अमृता फडणवीस.

मुंबई -/ आपण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो, तसे काम पुढच्या पिढीसाठी करावे, असे आवाहन प्रसिद्ध सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केले, तर सर्व पत्रकारांनी लोककल्याणासाठी पत्रकारिता करावी, असे मत अमृता फडणवीस यांनी मांडले. मुंबई येथे ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ व ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२४ सोहळा, तसेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा सन्मान व पदग्रहण सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्याला अभिमान वाटावा असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच जणांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता. व्यंकटेश जोशी, सीमा सिंग, वैभव वानखडे, डॉ. विजय दहिफळे, शिवाजी बनकर, तर पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२४ ने दिलीप वैद्य, सुरज कदम, संदीप खडेकर, बाळासो पाटील,वृषाली पाटील या पाच जणांना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले.
मंगलप्रभात लोढा (मंत्री, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नावीन्यता), हेमंत पाटील (विधान परिषद सदस्य व अध्यक्ष, हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र), स्वामी श्रीकंठानंद ,प्रवर्तक (जागृत नाशिक जागृत भारत जागृत विश्व),
डॉ. शुभ विलास (लाईफस्टाईल कोच, कथाकार आणि लेखक), ब्रिजेश सिंह (महासंचालक व सचिव, माहिती व जनसंपर्क), अशोक काकडे (जिल्हाधिकारी, सांगली), पाशा पटेल, राजश्री पाटील (अध्यक्ष, गोदावरी समूह व पुरस्कार निवड प्रक्रिया प्रमुख), विशाल पाटील (संपादक, लोकशाही), आशितोष पाटील (संपादक, जय महाराष्ट्र), गगन महोत्रा, प्रदेशाध्यक्ष (इंटरनॅशनल चीफ‘व्हॉईस ऑफ मीडिया’), अनिल म्हस्के (प्रदेशाध्यक्ष ‘व्हॉईस ऑफ मीडिया’) आदी मान्यवर व्यासपीठ उपस्थित होते. अशोक काकडे यांनी उपस्थित सर्व पत्रकार यांना कर्तव्यपणाची दीक्षा दिली. ‘आवाज विश्वातल्या पत्रकारांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन, ‘विजयी भव’ आणि ‘जिकंलेले योद्धे’ या पुस्तकांच्या मराठी, हिंदी, इंग्लिश, कव्हरचे प्रकाशन, मासिक ‘नयन अक्षर’चे प्रकाशन मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आले. पत्रकार आणि पत्रकारिता या विषयांवर कार्यक्रमात चिंतन झाले.

रेणुका कोटंबकार साहसिक NEWS-/24 मुंबई 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!