आर्वी -/तालुक्यातील देऊरवाडा घाटावर काही दिवसापासून आधुनिक पद्धतीने नावे द्वारे वर्धा नदीवर अवैध रेतीच्या उपसा सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी तक्रार करुनही कठोर महसूल विभागाने कारवाई केली नाही त्यामुळे अवैधरीत्या वाळू उत्खनन सुरूच होते. 26 एप्रिल रोजी आर्वी विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे हे स्वतः देऊरवाडा घाटावर जाऊन होत असलेल्या उत्खनंची पाहणी व माहिती घेतली असता शेकडो ब्रास रेती काढलेली आढळली बोटीच्या माध्यमातून नदी पात्रातून पाईप द्वारे रेती काढण्यात येत असून आमदार केचे यांनी देऊरवाडा येथील पटवारी यांना सोबत घेऊन अनेक ठिकाणी पाहणी केली असता 12 ते 15 रेतीचे मोठे मोठे ढिगारे त्यांना दिसले अवैध उत्खनन कोणाच्या इशाऱ्यावर सुरू असून अधिकाऱ्यांना यांची माहित नाही का यांची विचारणा केली आहे . त्या भागातील पोलीस पाटील, पटवारी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांना या उत्खननांची माहिती नाही का हे प्रश्न निर्माण होत आहे . ही अवैध उत्खनन करून रेती चे ढीग लावल्या गेले आहेत ती जागा कुणाची आहे त्या जागेत त्या मालकावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार दादारावजी केचे यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा गोरगरिबांना घरकुलाला वाळू मिळत नाही पण येथील हे गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी येथे अवैध रेतीचे उत्खनन करून बाहेर विकत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशाची राख रांगोळी होत आहे गरीब माणूस याचे घरकुल याच्या नावांना आलेले आहे अशा लाभार्थ्यांना रेती मिळत नसून येथे रेती चोरून चोरटे रेती जास्त भावाने बाहेर विकल्या जात आहे अनेक दिवसापासून सुरू असलेला हा अवैध रेती उपसा व्यवसायात
अधिकाऱ्यांचे सुद्धा सहभाग असायला पाहिजे अश्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी करुन
रेती उपसा करणारे साहित्य व नाव जप्त करण्याचे आदेश दादाराव केचे यांनी दिले
एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने रेतीचा उपसा करून साठा व विक्री होत असताना प्रशासनाला त्याची कोणती माहिती नाही मात्र आमदार दादाराव केचे यांनी प्रत्यक्ष उपसा करण्यात आलेल्या अवैध रेतीचा साठा शोधल्यामुळे हा चोरीचा प्रकार उघडकीस आला एवढ्या मोठ्या प्रमाणे प्रमाणात राजरोसपणे रेतीचा अवैध उपसा होत असताना प्रशासन झोपी गेले होते का हाही प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होत आहे.