पुलगाव वरुन विटाळा अमरावती कडे जाणारा वर्धा नदी वरील जीर्ण झालेला पुलाकरिता ५० करोड रुपयांचा निधी मंजूर,नितीनजी गडकरी यांनी दिली त्वरित मंजुरी”
देवळी -/ मागील अनेक दिवसापासून पुलगावकर जनतेची वर्धा नदीवरील अमरावती जिल्हाला जोडणारा राज्य महामार्ग ३२२ वरील जीर्ण झालेल्या धोकादायक पूल बांधण्याची मागणी होती, या आधी अनेक स्तरावर या मागणीचा पाठपुरावा आमदार होण्यापूर्वी ही राजेश बकाने यांनी घेतला, आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री नितीनजी गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली व केंद्रीय राखीव रस्ते विकास निधी अंतर्गत ५० कोटी रुपयाची मागणी केली, आमदार बकाने यांनी मा. गडकरी यांना सांगितले की हा अमरावती व वर्धेला जोडणारा पूलगाव शहराकडून जाणार रोड असून धोकादायक असल्याने वाहतूकीस बंद होता, परंतु दोन्ही कडचे शेतकरी व नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत होते, म्हणून मोठ्या अपघाताचा धोका होता, म्हणून हा पूल करणे अत्यंत आवश्यक आहे, गडकरी साहेबांनी त्वरित मागणीला प्रतिसाद देत केंद्रीय राखीव रस्ते विकास निधी अंतर्गत ५० कोटींचा निधी मंजूर केला व लवकर काम सुरु करण्याचे आश्वासन दिले, या वेळी माजी खासदार रामदासजी तडस, भाजपा जिल्हा सरचिटणीस राहुल चोपडा, जगदीश टावरी उपस्थित होते, ही मागणी पूर्ण झाल्याने पुलगावकर जनतेत अत्यंत आनंदाचे वातावरण आहे,नागरिकांनी आमदार राजेश बकाने यांचे आभार व्यक्त केले आहे