आम राजेंद्र राऊत यांचे विरोधात दिव्यांगाचा निषेध मोर्चा
देवळी/सागर झोरे
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिव्यांगा विषयी अपमानास्पद शब्दांचा वापर करून त्यांच्या भावना दुखावल्या प्रकरणी देवळी शहरातील निषेध मोर्चा काढण्यात आला.आमदार राऊत यांच्या पुतळ्याला चप्पलांचा हार घालून मोर्चा पोलीस स्टेशनवर नेण्यात आला. पोलीस निरीक्षक तिरूपती राणे यांना निवेदन देऊन आमदार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. राज्यात परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून संप सुरू असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. न्याय हक्कासाठी या कर्मचाऱ्यांनी ठीक ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बार्शीचे आमदार राऊत यांनी अश्याच एका आंदोलन मंडपाला भेट देऊन परिवहन महामंडळाच्या तोट्याला फुकटात प्रवास करणारे दिव्यांग व त्याचा सहकारी कारणीभूत असल्याचे वक्तव्य केले. ,त्यामुळे दिव्यांगासाठी असलेल्या कायदयाचा अपमान झाला असल्याने आमदार राऊत यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरण्यात आली. आमदार राऊत मुर्दाबादचे नारे देऊन निषेध करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कुऱ्हटकर,अमोद क्षीरसागर, पंकज गावंडे, जब्बार तंवर, नरेश वैद्य, सचिन पोहाणे, ज्ञानेश्वर गिरसपुंजे व पदाधिकारी यांनी केली. या मोर्चात जिल्ह्यातील दिव्यांगाची उपस्थिती होती.