आयसरच्या धडकेत सायकलस्वार 12 वर्षीय मुलाचा मृत्यू सेलू सुकळी रोडवरील वर्धा बायपास पूलाजवळील घटना….

0

🔥आयसरच्या धडकेत सायकलस्वार 12 वर्षीय मुलाचा मृत्यू….सेलू सुकळी रोडवरील वर्धा बायपास पूलाजवळील घटना.

सेलू -/ सेलू येथे सुकळी रोडवरील वर्धा बायपास पुलाजवळ वर्धकडे जाणार्‍या आयशरने सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर वैभव मनोज करपाते वय १२ वर्ष राहणार बोरी बोरधरण असे मृत मुलाचे नाव आहे ही घटना मंगळवारी ता १७ ला दुपारी २ वाजताचे सुमारास घडली
वैभव हा आपले मोठे वडीलाकडे सेलूला होता मंगळवारी दुपारी दोन वाजताचे दरम्यान सायकलने घराबाहेर पडला तो सायकलने सेलूकडे जात असताना समोरून येणार्‍या विनानंबरचे आयसरने वर्धेकडे जाताना पुलापासून वळण घेत असताना धडक दिली यात तो चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहीती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.

         चैताली गोमासे                    साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!