🔥आर्णीत आजपासून पं.प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेस प्रारंभ.
🔥२ दोन हजार स्वयंसेवक देणार सेवा.
आर्णी -/श्री.बहिरमदेव महापुराण सेवा समिती ट्रस्ट आर्णी यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय कथा वाचक पं.प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेस आजपासून प्रारंभ होणार असून,यासोहळ्याला लाखोंचा जनसागर उसळणार असल्याने,ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे.आर्णीच्या इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय कथा वाचक,भागवत भूषण प्रदीप मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृत वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.३० मार्च ते ५ एप्रिल श्री.सिद्धेश्वर नगरीत होणाऱ्या या कथेसाठी ६४ एकर परिसरात तीन लाख २० हजार फुटाचा कथा मंडप उभारण्यात आला आहे. लाखो भाविकांची उपस्थिती राहणार असल्याने महसूल, नगर परिषद,पोलिस प्रशासनासह स्वयंसेवक सज्ज झाले आहे.श्री.बहीरमदेव महापुराण सेवा समिती ट्रस्टने या शिव महापुराण कथेचे आयोजन केले असून दोन हजार स्वयंसेवक सेवा देणार आहे.दररोज दुपारी एक ते चार यावेळेत शिव महापुराण कथा तर रोज सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत हरिपाठ,रात्री आठ ते १० वाजेपर्यंत विविध महाराजांचे कीर्तन होणार आहे. या कथेला जिल्ह्यासह राज्यातून भाविक येणार असल्याने दोनवेळा महाप्रसाद, मुक्कामाची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या कथेमुळे परिसरातील बेरोजगारांना तात्पुरता रोजगार प्राप्त होणार आहे.
_______________________________________
🔥आर्णीच्या महाशिवपुरणासाठी २२ विशेष बसफेऱ्या
शिवमहापुराण कथेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. विविध आगारातून २२ बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, पांढरकवडा, नेर, राळेगाव आगार बसस्थानकावरून प्रत्येकी दोन, तर दारव्हा आणि दिग्रस आगारातून प्रत्येकी चार बसेस सोडल्या जाणार आहे. आर्णी बसस्थानकावरून जादा वाहतुकीच्या नियोजनाची जबाबदारी राजू उईके, गजानन पोले, गजानन खंडाते,वाकोडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
____________________________
🔥आर्णीत आज आठवडी बाजार बंद.
बहिरमदेव शिवमहापुराण सेवा ट्रस्टच्या वतीने ३० मार्च ते ५ एप्रिलदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा होत आहे. या कार्यक्रमाच्या पृष्ठभूमीवर आर्णी येथे ३० मार्च रोजीचा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हा आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार आज आर्णी येथील आठवडी बाजार बंद राहणार आहे.
____________________________
या शिवमहापुराण कथेसाठी पार्किंग, वाहतूक व सुरक्षेसाठी आर्णी पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.आम्ही पोलिस अधिकारी, कर्मचारी,होमगार्ड यांची बंदोबस्तासाठी मागणी केली आहे.५० पोलिस अधिकारी तसेच ११०० पेक्षा अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे.
नीलेश सुरडकर ठाणेदार,पो.स्टे आर्णी
____________________________ हिंदू -मुस्लिम ऐकतेच प्रतीक म्हणून परिसरात ओळख असलेल्या आर्णी येथे आज पासून शिवमपुराण ला सुरवात झाली. पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे सुमधुर वाणीतून शिवमहापुराण श्रवण करण्यास झालेल्या तोबा गर्दीस येन उन्हाळ्यांत तहान भागवीन्यास, शहरातील मुस्लिम युवकानी पुढाकार घेत आज पहिल्याच दिवशी थंड पानी व शरबत व्यवस्था केली. नगर सेवक अन्वर पठान, लाला फाजलानी, जावेद सोलंकी, इणूस शेख यांचे सह अनेक मुस्लिम युवकानी यात सहभागी होऊन दखल पात्र कार्य केले.
सोमवार पासून सुरु होत असलेल्या महाशिवपुराण कथा चे आयोजन केलेले आहे या कथेसाठी जगप्रसिद्ध कथा वाचक माननीय प्रदीप जी मिश्रा शिहोर वाले यांना बोलावण्यात आलेले आहे तरी येणाऱ्या लाखो भाविक भक्तासाठी आरणी येथील प्रतिष्ठित व्यापारी गोपालजी कोठारी यांनी भक्तांना आवाहन केले आहे की सोबत येताना प्रत्येक भाविक भक्ताने पाण्याची बाटली सोबत आणावी जेणेकरून कथास्थळी प्लास्टिकचा कचरा होणार नाही आणि प्रदूषणचा धोका वाढणार नाही याची दखल घेत सर्व भाविक भक्तांना त्यांनी कथास्थळी येण्याचे आवाहन केलेले आहे सदर कार्यक्रमाचे आयोजनासाठी गोपालजी कोठारी व त्यांच्या टीमने खूप परिश्रम घेतले आहे.