आर्णी तहसीलदारांच्या दरबारात ‘कुंटणखाना’ चालकाचा प्रामाणिकपणाचा बनाव,‘चोर चोर मावस भाऊ’ जोडीचा पर्दाफाश!..

0

🔥हेच ते तहसीलदार वैशाख वाहूरवाघ आर्णी तहसीलदारांच्या दरबारात ‘कुंटणखाना’ चालकाचा प्रामाणिकपणाचा बनाव,‘चोर चोर मावस भाऊ’ जोडीचा पर्दाफाश!..   🔥हाच तो तथाकथित पत्रकार हरिओम बघेले लोनबेहळ येथे उघडपणे कुंटणखाना चालवीणारा.🔥हेच ते लोणबेहळ येथे हॉटेल उघडपणे कुंटणखाना चालविणारे 

यवतमाळ -/ ज्यांच्या हातात न्याय आणि सामान्यांचे रक्षण करण्याची धुरा आहे, त्याच तहसील कार्यालयात सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सुळसुळाट झाला आहे की काय, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. लोणबेहळ येथे उघडपणे कुंटणखाना चालविणारा तथाकथित पत्रकार हरिओम बघेले आणि लाचखोरीसाठी कुख्यात असलेले तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्यातील ‘मधुर’ संबंधांची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. एका शेतकऱ्याची बॅग सापडल्याचा बनाव करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा जो प्रकार घडला, तो निव्वळ ‘स्टंटबाजी’ असून यामागे मोठे रॅकेट दडल्याचा संशय बळावला आहे.
​तहसील कार्यालयात एका शेतकऱ्याची ४० हजार रुपये रोख असलेली बॅग गहाळ झाली. योगायोग असा की, ती बॅग कुंटणखाना चालविणारा हरिओम बघेले यालाच सापडली. बघेले याने ती बॅग थेट वादग्रस्त तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्या स्वाधीन केली. काही वेळातच तो शेतकरी तिथे अवतरला आणि त्याला त्याची बॅग सुखरूप मिळाली. वरकरणी ही घटना ‘माणुसकी’ची वाटत असली, तरी आर्णी शहरात मात्र वेगळीच चर्चा रंगली आहे.
​हा संपूर्ण घटनाक्रम हरिओम बघेले याने आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी रचलेला एक ‘सुपरहिट फ्लॉप’ सिनेमा असल्याची टीका नागरिक करत आहेत. ज्याच्या हॉटेलवर वेश्याव्यवसायाचे काळे धंदे चालतात, तो अचानक इतका प्रामाणिक कसा झाला? असा सवाल आता विचारला जात आहे. ​विशेष म्हणजे, ज्यावेळी हा ‘प्रामाणिकपणाचा’ खेळ सुरू होता, तेव्हा तिथे वेश्याव्यवसाय चालविणारा दुसरा तथाकथित पत्रकार मनोजदेखील हजर होता. वेश्याव्यवसायातील दोन दलाल आणि एक भ्रष्ट अधिकारी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ‘चोर चोर मोसरे भाई’ ही म्हण तंतोतंत लागू होते. या टोळीने मिळून तहसील कार्यालयाला आपल्या काळ्या कारनाम्यांचे केंद्र बनवले आहे की काय, अशी भीती व्यक्त होत आहे
​लोणबेहळ येथील ज्या हॉटेलमध्ये रशियन आणि बंगाली ललनांचा बाजार भरवला जात होता, ते हॉटेल पोलिसांनी बंद केले. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे हॉटेलचा मालक आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हरिओम बघेले याच्यावर अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही.
जर हॉटेलमध्ये बेकायदेशीर कृत्य सुरू होते, तर मालकाला अभय कोणाचे?
​दारव्हा येथील पोलीस कर्मचारी श्रावण राऊत यांची या प्रकरणात नेमकी मध्यस्ती काय?
​रशियन आणि बंगाली मुली पुरविणाऱ्या या आंतरराज्य रॅकेटची पाळेमुळे पोलिसांना का सापडत नाहीत?
​श्रावण राऊत नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने केलेली मध्यस्ती सध्या आर्णी आणि दारव्हा परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. गुन्हेगारांना वाचवण्यासाठी खाकी वर्दीचा वापर होत असेल, तर जनतेने न्याय कोणाकडे मागायचा?
​​यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याची गरज आहे. केवळ हॉटेल सील करून भागणार नाही, तर पत्रकारितेच्या नावाखाली कुंटणखाना चालविणारे बघेले आणि मनोज यांच्या संपत्तीची चौकशी होणे गरजेचे आहे. या ‘ललना सप्लाय’ रॅकेटमध्ये मोठे मासे अडकल्याची शक्यता नाकारता येत नाही.
१. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात यावे.
२. तहसीलदार आणि कुंटणखाना चालकाचे कॉल डिटेल्स तपासून त्यांचे लागेबांधे स्पष्ट करावेत.
३. वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करून त्यांना जेलची हवा दाखवावी.
​आर्णीच्या तहसील कार्यालयात चाललेला हा ‘बनाव’ आणि गुन्हेगारांचे वाढलेले धाडस प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कोर्टात असून, ते या ‘चोर-भावांच्या’ टोळीचा बंदोबस्त करतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 आर्णी, यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!