आर्वी येथील संदीप कुमार सिंह कदम यांचा मेघा पेट्रोल पंप शासनाच्या पुढील आदेशापर्यंत सिल: तालुका निरीक्षण अधिकारी यांचा अहवाल.
तालुका प्रतीनिधी/आर्वी:
आर्वी शहरातील रहिवाशी असलेले प्रदीप आनंदराव मानकर, यांनी आर्वि येथील मेघा पेट्रोल पंपावर आज सकाळी साधारणत: 10:15 च्या दरम्यान १५० रुपयाचे पेट्रोल भरले असता यांची दुचाकी थोड्याच अंतरावर जावून बंद पडली. मानकर यांची गाडी बंद पडल्यामुळे त्यांनी लगतच्या मेकेनिक कडे दाखविली असता गाडीमध्ये भरलेले पेट्रोल हे भेसळयुक्त असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.
त्यानुसार पीडित आनंदराव मानकर यांनी संबंधित तालुका निरीक्षक अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली असता संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी तत्काळ दखल घेत पंचनाम्या करिता घटनास्थळ गाठले व पंचनामा सुरू केला.
सदरच्या पंचनाम्यामध्ये पेट्रोल चे मोजमाप करीत तांत्रिक तपासणी करिता ५०० एम.एल. पेट्रोलचे नमूने सेल्स ऑफिसर, नागपूर यांना पाठविण्यात आले.
वरील तपासणी पूर्ण होवून अंतिम अहवाल येईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मेघा पेट्रोल पंपावरून पेट्रोलची विक्री थांबविली व पुढील आदेश येईपर्यंत तहसिलदार आर्वी यांच्या आदेशानुसार वरील मेघा पेट्रोल पंप सिल करण्यात आला.