आर्वी -/विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व आमदार सुमित वानखेडे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा १६ मार्च २०२५ रोजी शासकीय तंत्रनिकेतन, आर्वी येथे होणार आहे.या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच अभियांत्रिकी पदवी, पदविका, आयटीआय उत्तीर्ण आणि इतर व्यावसायिक पदवी व पदविका धारक उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा दिनांक १ मार्च २०२५ पर्यंत आमदार सुमित वानखेडे यांच्या जनसंपर्क कार्यालय, आर्वी येथे जमा करावा.आर्वी मतदारसंघातील बेरोजगार युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुमित वानखेडे यांनी केले आहे.