आर्वी विधानसभा क्षेत्रात मकरंद देशमुख बनले गोरगरीब जनतेचा सहारा….

0

साहुर,आष्टी -/ येथील जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश उर्फ मकरंद देशमुख यांनी आजवर जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विविध आंदोलने उपोषणे करून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिला.80% समाजकारण व 20% राजकारणाच्या माध्यमातून मुकेश उर्फ मकरंद देशमुख यांचा आर्वी विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क तयार झाला अशा नवीन चेहऱ्याचा विचार झाल्यास मतदारसंघातील विविध ज्वलंत प्रश्न सोडवण्यास मदत होईल.येणाऱ्या विधानसभेत राजकीय पक्षांनी उमेदवार देतांना त्यास त्या उमेदवारांना किंवा त्याच उमेदवारांच्या घरातील व्यक्तींना उमेदवारी देण्यापेक्षा नवीन विकासाच्या दृष्टिकोन असलेल्या, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नवीन उमेदवाराला संधी दिल्यास आर्वी विधानसभा मतदारसंघाचा विकास होऊन/चेहरा मोहरा बदलू शकतो.सन 2015 जनशक्ती संघटनेच्या स्थापनेपासून आतापर्यंत जनशक्ती संघटनेनी विविध उपक्रमात आपला सहयोग दिला. मग त्यामध्ये आष्टीचे ग्रामीण रुग्णालय, मुलींचे समाजकल्याणचे वस्तीगृह, थार,बोरखडी, बामर्डा, मोई या दुष्काळग्रस्त गावातील पाण्याचा प्रश्न निकाली लागण्यासाठी सर्वोत्परी मदत, आष्टीतील पूरग्रस्तांना आर्थिक मदत, कोविड काळात गरजूंना धान्य पुरवठा, तळेगाव आष्टी मार्गावरील कठड्यांचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांचा जनशक्ती चे मकरंद देशमुख यांनी मार्ग मोकळा केला.आष्टी येथील पेट अहमदपूर येथे 2019 मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत तसेच अंतोरा येथील माणिकनगर, किन्हाळा, परसोडा या गावात जनशक्ती संघटनेच्या सहकार्यातून ग्रामपंचायती तसेच जोलवाडी, दुर्गवाडा येथील ग्रामपंचायत मध्ये थोड्याफार फरकांनी सत्ता येता येता राहून गेली परंतु मोठ्या प्रमाणात कामे केल्याने गोरगरीब जनता मकरंद देशमुख यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे कारण आष्टी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नासाठी अनेकदा आंदोलने केली ,जातीय सलोखा कायम राहावा यासाठी 2016 पासून ईद मिलन सोहळा साजरा केला जातो.आष्टी नगरपंचायतच्या वार्ड क्र.०२ इंदिरानगर झोपडपट्टी येथील घरकुलाच्या प्रश्नासाठी भीक मांगो आंदोलन केले.नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप तसेच दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन केले.गोरगरिबांना व गरजूंना दिवाळीनिमित्त कपडे व वस्तूंचे वाटप करण्यात येतात , ग्रामीण रुग्णालयात पूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत जनआंदोलन केली.तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी तसेच उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारे व शेतकऱ्यांचा नागरी सत्कार हा कार्यक्रम दरवर्षी राबवण्यात येतो. आष्टी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार होण्यासाठी पाठपुरावा केला अशा प्रकारची अनेक कामे केल्याने जनतेच्या मनात विश्वास निर्माण केल्याने मकरंद देशमुख हे जनतेचा सहारा बनले आहेत हे विशेष

शरद वरकड साहसिक न्यूज -/24 साहूर, आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!