आर्वी -/विविध सामाजिक संघटनाच्या वतीने कश्मीर येथील पुलवामा मध्ये आतंकवादी यांच्या कार्याता पूर्ण हल्ल्यात 40 सैनिक शहीद झाले होते. या शहिद जवानांना आर्वी शहरातील गांधी चौक येथील जयस्तंभा ला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवादी कडून भ्याड हल्ला करण्यात आले या भ्याड हल्ल्यात भारत मातेचे 40 जवान शहीद झाले. या शहिदांना श्रद्धांजली वाहण्या करिता गांधी चौकातील जय स्तंभाला प्रमुख पाहुणे माजी आमदार दादारावजी केचे तसेच प्रमुख अतिथी गीतांजली गारगोटे पीएसआय, मिलिंद पाईकराव ,रवींद्र अवसरे ,लखन अग्रवाल ,सूर्यप्रकाश भट्ट ,यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करते वेळी भारत माता की जय ,वंदे मातरम ,वीर जवान अमर रहे, घोषणा देत श्रद्धांजली वाहण्यात आली. या श्रब्दांजली कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र शिरगरे यांनी केले व आभार गुड्डू पठाण यांनी मानले या कार्यक्रमाला मोहमद जमील ,मंगल ठाकूर ,सादिक भाई ,मोहमद आरिफ ,दर्पण टोकसे, गुड्डू पठाण ,सागर मोरघरे, प्रवीण शर्मा, प्रभाकर निंबाळकर ,अनिरुद्ध देशपांडे ,आकाश गुल्हाने ,राजेंद्र नेवारे, सुशील कट्टा ,मोहसीन शेख, प्रतीक खांडेकर, संजय ताजनेकर, अविनाश भुसाटे ,परीक्षित नांदेकर, कृष्णा इंगळे, रितेश ताजनेकर, नितीन आष्टीकर, संजय महाजन, शिरीष काळे ,न्यालसिंग चव्हाण ,महेश बिरोले ,राजेंद्र शिरगरे, शैलेश तलवारे, प्रदीप रुईकर, सूर्यप्रकाश भट्टड आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.