पुलगाव -/ येथे आर के हायस्कूल समोरील पीडब्ल्यूडी ने नाली चे काम गेल्या एकमहिन्यापासून पूर्ण केले नाही.१९ जुन पासून पीडब्ल्यूडी ने हे काम सुरू केले होते तेव्हाच आर के स्कूल येथील मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितले होते की आमची शाळा १ जुलै रोजी सुरू होणार आहे तेव्हा त्यांनी आम्हाला तुमच्या शाळेसमोर चे काम आम्ही २८ जून तारखेपर्यंत पूर्ण करून देऊ परंतु आज शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरीसुद्धा आजपर्यंत पीडब्ल्यूडी ने काम पूर्ण केले नाही.आमच्या शाळेमध्ये नर्सरी ते बारावीपर्यंत मुले शिक्षण घेतात आणि चार हजार मुले मुली रोज या खोदलेल्या नाल्यावरून जाणे येणे करतात. तसेच आमच्या हायस्कूलच्या अंतर्गातून विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरिता लाकडी पाट्यांचा एक पूल तयार केला.आणि आमच्या शाळेतील मुला मुली त्या लाकडी फाट्यावरून येणे जाणे करतात कित्येकदा या लाकडी पुलावरून घसरून मुले पडून किरकोळ जखमी सुद्धा झाले आहे.कित्येकदा पीडब्ल्यूडी आणि पोलीस स्टेशन पुलगाव येथे सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे की आमच्या शाळेतील मुलांना या नाल्यामुळे काही गंभीर झाल्यास शाळा जबाबदार राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी पीडब्ल्यूडी ची राहील आम्ही त्यांना हे पण सांगितले की तुम्ही हा नाला सध्या तरी बुजवून द्या. परंतु याकडे पीडब्ल्यूडी काही लक्ष देत नाही कोण्या दिवशी लहान मुले तेथून येणे जाणे करतात आणि ते जर त्या नाल्यात पडले तर त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते हे नाकारता येत नाही तरी आमची पत्रकार बंधूंना शाळेची व पालकांची विनंती आहे की आपण या शासनाचे त्वरित डोळे उघाडणी करावे व आर के शाळा समोरील काम लवकरात लवकर सुरू करावे हीच पत्रकारांना माहिती सांगून त्वरित या रस्त्याचे काम करावे ही शासनाला विनंती केली आहे.