वर्धा -/ साहित्य कला शोधक मंचाद्वारे सलग 38 व्या वर्षी आयोजित विदर्भ स्तरीय यादे रफी सूरसंगम स्मार्ट सिंगर-2024 फिल्मी गीतगायन स्पर्धेचा विजेता यवतमाळचा प्रतिभावान गायक आशिष कैथवास हा ठरला. द्वितीय पुरस्कार हिंगणघाट येथील प्रतीक म्हैसकर, तर तृतीय पुरस्काराची मानकरी यवतमाळ येथील पूजा शेंदरे ही ठरली. उदयोन्मुख गायकांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ही स्पर्धा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात उत्तरोत्तर रंगत गेली.या स्पर्धेत विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून तब्बल 70 स्पर्धक सहभागी झाले. स्पर्धेत एकूण 62 हजार रुपयांची रोख बक्षिसे वितरित करण्यात आली. या स्पर्धेचा चतुर्थ पुरस्कार नागपूर येथील लाजरी भुरे आणि पाचवा पुरस्कार हिंगणघाट येथील सम्यक मून याने प्राप्त केला. अंतिम फेरीतील उर्वरित 9 स्पर्धकांना प्रत्येकी 2001 रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात आला. यात आयुष मानकर (नागपूर), मयुर पटाईत (वर्धा), मिताली आनंद (नागपूर), चिन्मय बोंडे (चंद्रपूर), तनीश गजभिये (नागपूर), रिता खोडे (टाकळी, वर्धा), शुभम विरुटकर (घाटंजी, यवतमाळ), ऋषभ लोणबळे (पोहणा), अनघा लोणारे (यवतमाळ) यांचा समावेश आहे.सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सर्व गायकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकार संजय तिगांवकर, एमटीडी ज्वेलर्सचे संचालक अमोल ढोमणे, तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे विदर्भ हेड अभय पुणेवार, मे. इब्राहिम आदमजी अँड सन्सचे आसिफ जाहिद यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल होते. यावेळी सुप्रसिद्ध उद्योगपती कमलेश ठवकर (नागपूर), माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पावडे, संपादक रवींद्र कोटंबकार, कृष्णगिरी लॅन्ड डेव्हलपर्सचे संचालक महेश गुल्हाने,पत्रकार नरेश डोंगरे, विद्या कळसाईत, कृ. ऊ. बा. स. सेलू संचालिका रेणुका कोटंबकार, तुमसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात मागील वर्षीची विजेती सानिका बोभाटे ही देशातून दुसऱ्या क्रमांकाची गायिका ठरल्याबद्दल तिला सन्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणा-या संगीततज्ज्ञ मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेचे संगीत संयोजन राजेंद्र झाडे, तर साऊंड सिस्टिमची बाजू प्रशांत कोल्हे यांनी सांभाळली. प्रथम फेरीचे परीक्षण वर्षा गाठे (अकोला), कवी नेसन (वर्धा), मेघा सुपारे (वर्धा) यांनी केले. अंतिम फेरीचे परीक्षण अमित लांडगे (वर्धा), शेख मोबीन (वाशिम) आणि निशा वानखेडे (अमरावती) यांनी केले. प्रथम फेरीचे सूत्रसंचालन किरण पटेवार, तर अंतिम फेरीचे सूत्रसंचालन असलम खान यांनी केले. कोषाध्यक्ष प्रशांत चवडे यांनी आभार मानले. आयोजनाकरिता साहित्य कला शोधक मंचचे अध्यक्ष सुनील बुरांडे, सचिव प्रभाकर उगेमुगे, कार्याध्यक्ष दिलीप मेने, उपाध्यक्ष गिरीश सावळकर, सहसचिव हरीश कनोजे, मोहन शेवळे, कोषाध्यक्ष प्रशांत चवडे, प्रशांत हटवार, सुनील काळे, चंद्रजित टागोर, आनंद मून, अमर काळे, प्रशांत चव्हाण, विकास फटिंगे, प्रल्हाद मानकर, अशोक तुरक्याल, महेश मुधोळकर, अतुल पिसे, राजेंद्र कळसाईत, अविनाश भोळे, गजानन निनावे, अॅड. अरुणा खरे, डॉ. विजय लोखंडे, प्रल्हाद मानकर, विकास फटिंगे, दादाजी धुनिवाले मठाचे व्यवस्थापक भास्कर वाळके, मैत्री सामाजिक संस्थेचे पंकज घुसे यांनी सहकार्य केले.पहिल्या 15 स्पर्धकांना रोख पुरस्कार या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार 17001 स्व. गायत्रीदेवी अग्रवाल स्मृती मोहन अग्रवाल यांच्याकडून प्रायोजित करण्यात आला. द्वितीय पुरस्कार 11001 रुपये स्व. सरस्वती बुरांडे स्मृती सुनील बुरांडे यांच्याकडून, तृतीय पुरस्कार 7001 स्व. राजेंद्र खरे स्मृती अँड. अरुणा खरे यांच्याकडून, चतुर्थ पुरस्कार 5001 रुपये स्व. सुनील कोटगीरवार स्मृती प्राचार्य जयश्री कोटगीरवार यांच्यातर्फे, पंचम पुरस्कार 3001 रुपये नागपूरच्या सुप्रिम बँकींग क्लासेसचे राजेश बारापात्रे यांच्याकडून प्रायोजित करण्यात आला. यासोबत प्रत्येकी 2001 रुपयांचे 9 प्रोत्साहन पुरस्कार स्व. सत्यनारायण बजाज स्मृती प्रदीप बजाज यांच्याकडून, स्व. विजया कठाणे स्मृती अनिल कठाणे यांच्याकडून, स्व. फकरुद्दीन हसनअली स्मृती इब्राहिमजी आदमजी अँड सन्सतर्फे, मिना शेवळे स्मृती मोहन शेवळे यांच्यातर्फे, स्पर्श सेवा फिजीओथेरपी आणि पुनर्वसन केंद्राचे संचालक डाँ. अजय वाणे यांच्यातर्फे, कृष्णगिरी लँड डेव्हलपर्सचे संचालक महेश गुल्हाने यांच्यातर्फे, चित्रकार स्व. मारोतराव तिळले पेंटर स्मृती संजय तिळले यांच्यातर्फे, स्व. गोपाल अडवाणी स्मृती गणेश प्लाझातर्फे प्रायोजित करण्यात आले.