आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाचा निर्णय शेतकरी हिताचा…

0

🔥पत्रकार परिषदेत वर्धा जिल्हा भाजपाचे महामंत्री अशोकराव विजयकर यांचे प्रतिपादन.

आष्टी (शहीद) -/ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था , वर्धा यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी व नव्याने कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती झाल्यामुळे दोन्ही तालुक्याला आता स्वतंत्र बाजार समित्यांचा दर्जा झाल्यामुळे सदर निर्णय दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा ठरला आहे. असे प्रतिपादन ७ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत वर्धा जिल्हा भाजपाचे महामंत्री अशोकराव विजयकर यांनी केले आहे. विभाजन करण्यामागे ठोस आधार देताना निगर्मीत झालेल्या अधिसुचनेत म्हटले आहे की, वर्धा जिल्ह्यात आठ महसूल तालुके असून कारंजा घाडगे तालुका वगळता सातही ठिकाणी बाजार समितीची स्थापना झाली आहे. कारंजा येथे स्वतंत्र बाजार समिती व्हावी म्हणून आष्टी आणि कारंजा दोन्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. दोन्ही तालुक्याचा भौगोलिक परिस्थितीचा आणि तेथील शेतीविषयक उलाढालीचा विचार केल्यास दोन्ही बाजार समिती आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास वाव असल्याने तसेच त्यांना प्राप्त होणाऱ्या विविध उत्पन्नातून या बाजार समिती, भविष्यात त्यांचे कामकाज सुरळीत करू शकेल इतक्या भक्कम होईल असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. दोन्ही तालुक्यात शेतीचे पांदण रस्ते ,सिंचन सुविधा ,कृषी पंप जोडणी इत्यादी कारणामुळे सिंचन क्षेत्रात झालेली वाढ त्यामुळे दिवसेंदिवस शेतमालाचे उत्पन्नात व हंगामी पिकात वाढ होत असल्याने दोन्ही बाजार समितीत शेतमालाची सरासरी आवक वाढणार आहे परिणामी दोन्ही बाजार समित्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल याचा विचार करून तथा महाराष्ट्र कृषी पणन मंडळ पुणे यांचा अनुकूल अभिप्राय विचारात घेता आष्टी व कारंजा (घाडगे) अशा दोन बाजार समितीचे विभाजन करताना कृषी उत्पन्नाचे योग्य नियमन करणे व स्थानिक शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा विभाजन करण्यामागचा शासनाचा उद्देश स्पष्ट होत आहे. अशी पुष्टी ही अशोकराव विजयकर यांनी पत्रकार परिषदेत जोडली. आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या कार्यरत असलेले संचालक मंडळ तात्काळ प्रवाहने बरखास्त झाले असून आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीवर गौतम धोंगडे सहकार अधिकारी श्रेणी-१ यांची प्रशासक म्हणून तर कारंजा (घाडगे) कृषी उत्पन्न बाजार समितीवर संदीप भारती सहायक निबंध यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असेही अशोकराव विजयकर यांनी स्पष्ट केले. बाजार समितीच्या विभाजनाबाबत शासनाच्या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत होत असून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,विद्यमान नवनिर्वाचितआमदार सुमीतदादा वानखेडे , आणि माजी आमदार दादारावजी केचे तसेच महाराष्ट्र शासनाचा सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग पणन संचालक पणन संचालनालय पुणे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर, जिल्हाधिकारी वर्धा तथा जिल्हा उपनिबंधक वर्धा या सर्वांचे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा तर्फे व महायुतीच्या घटक पक्षातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

पत्रकार परीषदेला भाजपाचे जिल्हा महामंत्री अशोकराव विजयकर,भाजपाचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अॅड.मनिष ठोंबरे, बाजार समितीचे माजी संचालक अजय लोखंडे, रामदास लव्हाळे, व्यापारी आघाडीचे पदाधिकारी विलास चोहटकर, आध्यात्मिक आघाडीचे पदाधिकारी गजानन भोरे,अंतोरा सर्कल प्रमुख राजेश ठाकरे,आशिष खोपे तसेच सर्व पत्रकार बांधव आणि सर्व व्यापारी उपस्थित होते.

नरेश भार्गव साहसिक NEWS -24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!