🔥अजून किती अंत बघणार शेतकऱ्यांच्या एक नुकसानीचे. 🔥गेल्या दीड महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसाने शेतातील पिकांचे झाले नुकसान. 🔥शेतकऱ्यांना जावे लागणार नापिकीला सामोर.
आष्टी शहीद -/तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून सतत पाऊस सुरू असल्याने शेतातील पिके जागच्या जागेवर असून पीक अति पावसाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे आष्टी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा.
तालुक्यात जून महिन्यात पेरणीला सुरुवात झाली त्यातही पावसाने मध्ये दळी मारल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उडवल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली त्यानंतर शेतात उगवलेले पीक जोम धरत असतानाच सतत दीड महिन्यापासून पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन , कपाशी, तुर, यासह इतर पिके मस्त होण्याच्या मार्गावर आहे.सर्वत्र शेतात बाजार फुटले असून या पाजारामुळे शेतातील तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात जळाले. तर सोयाबीन कपाशी ही पिके जागच्या जागेवरच असून पेरणीला जवळजवळ दोन ते अडीच महिने होत असताना सुद्धा पिकांमध्ये कोणत्याच प्रकारची सुधारणा दिसत नसून शेतातील कामे ठप्प आहे रोज येणाऱ्या पावसामुळे उभे असलेली पिकांवर मर येत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. तरीही शेतकरी पिक जगण्या करिता आटोकाट प्रयत्न करीत आहे.
सोयाबीन पिकांना जवळजवळ दोन महिने पूर्ण होऊन सुद्धा सोयाबीनला पकडलेल्या शेंगा बुरशीमुळे घडवून जमिनीवर पडत आहे. कपाशी पिकाची वाढ खुंटली असून अनेक शेतकऱ्यांचे कपाशीचे एक तनाने गाजले असून शेतीवर खर्च करावा की नाही यावरही शेतकरी विचाराधीन आहे. कपाशीच्या पिकाला दोन महिने होऊन सुद्धा हितभर कपाशीची झाडे आहेत. सध्या स्थिती शेतात दलदल निर्माण झाल्याने शेतात चालणे कठीण झाले असून शेतातील सर्व कामे ठप्प आहे. येत्या दोन तारखेला शेतकऱ्याचा सण पोळा येऊन ठेपला असताना सुद्धा कपाशीचे पीक हितभर असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.अजूनही तालुक्यात पावसाचा कहर सुरूच असल्याने शेतकऱ्यांवर ओला दुष्काळाचे चावट निर्माण झाल्याने आष्टी तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन पाठवण्यात आले असल्याने याकडे शासनाने लक्ष देऊन आष्टी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.