आष्टी तालुक्यात जास्त तापमान वाढीमुळे संत्रा मोसंबीच्या फळगळीला मोठ्या प्रमाणात सुरुवात…..

0

🔥आष्टी तालुक्यात जास्त तापमान वाढीमुळे संत्रा मोसंबीच्या फळगळीला मोठ्या प्रमाणात सुरुवात.

साहुर,आष्टी -/ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी उत्पादक असून आंबिया बहाराचे शेतकऱ्यांनी नियोजन केलेले होते त्यानुसार झाडांना ताण देऊन फुटीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून आंब्या बहार घेण्याचे स्वप्न शेतकऱ्यांचे नाहीसे होत आहे व शेतकऱ्यांमध्ये निराशा होत असल्याचे दिसून येत आहे यावर्षी संत्रा मोसंबी च्या झाडांना चांगल्या प्रकारे फुलोरा पकडलेला होता आता त्याचे रूपांतर फळांमध्ये होत असताना अचानकपणे तापमानाचा पारा वाढत चालला असून छोट्या छोट्या फळांची गळ होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे झाडांवर फळे राहतील की नाही राहतील असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे फुलोरा आणि छोटे छोटे फळ हे या तापमानामध्ये टिकून राहणे फार कठीण असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून आंब्या बाहाराचे नियोजन केल्यामुळे अतोनात पैसा खर्च केला यामध्ये रासायनिक खते शेणखत फवारण्या सलमोडणे बोर्डिंग करणे इत्यादी प्रकारचा अतोनात खर्च झाला असून झाडावरील फळे मात्र खाली पडत असल्याचे पाहून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे हा एक नैसर्गिक प्रकोप असून त्याचा परिणाम थेट जगाचा पोशिंदा शेतकरी राजावर होत आहे त्यामुळे शासनाच्या वतीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे हे विशेष

       शरद वरकड साहसिक     News-/24 आष्टी,साहूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!