🔥उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे च्या महाप्रतापाने आष्टी पोलीस स्टेशन बनले व्यवहाराचा अड्डा.🔥हाच तो आष्टी ठाण्याचा उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे तक्रारदारांना किंवा गैर तक्रादारांना उद्धट वागणूक देऊन पैशाची मागणी करून शेती विकायला लावणारा.
आष्टी -/पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे यांचे भ्रष्ट व विचित्र मानसिकते मुळे पोलीस विभागावरील जनतेचा विश्वास हरपत असून पोलीस ठाणे हा व्यवहाराचा अड्डा होत असल्याचे दिसून येत आहे.
आष्टी पोलीस स्टेशन तहसीलचे स्टेशन असून या पोलीस स्टेशनला परिपूर्ण कर्मचारी नाही नुकत्याच पोलीस अधीक्षकांनी बदल्या केलेल्या पोलिसांच्या मध्ये अधिक तर कर्मचारी दारू पिऊन ड्युटी करणारे कर्मचारी आहे या ठाण्यावर कोणाचीही वचक नसल्याने काही काम करणारे कर्मचारी ना काम करण्यात अडचण येत असल्याचे दिसून येते ठाण्यामध्ये येणाऱ्या अदखल तक्रारीमध्ये पोलीस उप निरीक्षक राजेश उंदीरवाडे तक्रारदारांना किंवा गैर तक्रारदारांना उद्धट वागणूक देतात व त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना म्हणतात तुझ्यावर गुन्हा दाखल होते, तू जेलमध्ये जाऊ शकते, मग पन्नास हजार दे ,लाख दे, पैसे नसेल तर शेती विक, घर विक, कर्ज काढ अशा भीती दाखवून त्यांची लूट करतात पोलीस ठाण्यात त्यांची वागणूक एक गुंड प्रवुती सारखी आहे. माझे पोलीस अधीक्षक काही करू शकत नाही मी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या जवळचा आहे अशी सुद्धा बनवाबनवी करून नागरिकांना भीती दाखवतात यांनी न्याय न दिल्यामुळे काही दिवसा अगोदर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये यांनी जाणून-बुजून लक्ष न दिल्याने एका गरीब महिलेनी आत्महत्या केली
महिला तक्रारदारांना यापेक्षा वाईट अनुभव आलेले आहे पोलीस स्टेशनला महिला पोलीस अधिकारी नसल्याने अशी अधिकारी लज्जाहीन बतावणी करून त्यांना अवाच्य वागणुकीचा प्रकार सुद्धा घडत आहे ठाण्याचे ठाणेदार पवार यावर मुंग गिळून बसलेले आहे.
अनेक चोऱ्याचे प्रकरण या पोलिस ठाण्यात प्रलंबित असून अधिक तर प्रकरणे दाखल न करता बाहेरच्या बाहेर निकाली काढण्यात येते काही दिवसापूर्वी थार येथील शेतकऱ्यांनी त्यांचे शेतातील कुंपणाला करंट देण्याकरिता लावण्यात येणाऱ्या बॅटरी मशीन चोरी प्रकरणी संशयित व पुराव्यासहित आरोपी विरुद्ध तक्रार दिली असता त्या प्रकरणात सुद्धा या अधिकाऱ्यांनी गुन्हा तर सोडा चौकशी सुद्धा केली नाही
या भ्रष्ट उपनिरीक्षकामुळे काही महिन्या पूर्वी वर्धा नदीतील रेती चोरीचे प्रमाण वाढले होते हजारो रुपये हप्ता घेऊन याने शासनाच्या तिजोरीला चुना लावलेला आहे याबाबत नागरिकांनी पोलीस विभागाकडे विश्वास नसल्याने तक्रार न करता गृहमंत्री व लाच लुचपत विभागाकडे केल्याचे दिसून येते याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन तात्काळ कारवाईची मागणी होत असून या ठाण्याला कर्तबगार कर्मचारी व अधिकारी देण्याची मागणी होत आहे. (क्रमशः)