आष्टी बाजार समितीला सुधीर दिवे यांची सदिच्छा भेट…

0

आष्टी -/ येथे हृदयरोग निदान शिबिराच्या उद्घाटनाकरिता आलेले सुधीर दिवे यांना आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते व्यापारी यांनी बाजार समितीला भेट देण्याबाबत केलेल्या आग्रहावरून तेथील मार्केट यार्डला सदिच्छा भेट दिली आणि मंडीतील समस्यांची माहिती घेतली.संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती व स्व. वासुदेवराव देशमुख फाउंडेशन तथा ग्रामीण रुग्णालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने काल 9 डिसेंबर 2024 ला आष्टी येथे भव्य हृदयरोग निदान शिबिर आयोजिले होते त्याचे उद्घाटनाला सुधीर दिवे आष्टीला आले असताना नव्यानेच स्वतंत्र दर्जा प्राप्त झालेल्या आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते व व्यापारी यांनी त्यांची भेट घेऊन तेथील समस्या व बाजार समितीच्या विकासाबाबत चर्चा करण्याकरिता मंडीला भेट देण्याचा आग्रह धरला.त्यांच्या विनंतीवरून सुधीर दिवे यांनी मंडीला भेट देऊन पूर्ण मार्केट यार्डची पाहणी केली आणि तेथील असुविधा जाणून घेतल्या.

त्यानंतर समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अडते व व्यापारी यांनी त्यांच्यासमोर समस्या मांडून स्वतंत्र दर्जा प्राप्त झालेल्या आष्टीच्या बाजार समितीचा विकास करण्याची त्यांना विनंती केली. तसेच नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी बाबत ओलाव्याचे कारण देऊन नाकारले जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेतमाल खरेदीबाबत हस्तक्षेप करण्याची त्यांना विनंती करण्यात आली.यावेळी आष्टीचे प्रशासक गौतम घोंगडे व कारंजा समितीचे प्रशासक संदीप भारती प्रामुख्याने उपस्थित होते.
बाजार समितीचे सचिव नंदू वरकड,नव्यानेच रूजू झालेले प्रशासक गौतम घोंगडे,व्यापारी जगदीश राठी यांनी सुधीर दिवे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर दिवे यांनी सांगितले की लवकरच आमदार सुमित वानखेडे हे या बाजार समितीला भेट देऊन चर्चा करतील आवश्यक सुविधांची माहिती जाणून घेतील आणि समितीचा विकास आराखडा सरकारकडून मंजूर करून आणतील असा उपस्थितांना त्यांनी विश्वास दिला.
यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री अशोक विजयकर, राजेश ठाकरे,अजय लेकुरवाडे मार्केट यार्ड मधील अडते व्यापारी सर्वश्री जगदीश राठी, पुरुषोत्तम पाटील,नितीन लोखंडे,जाहिद खान, मंगेश बालपांडे, गौरव सव्वालाखे, भूषण नाथे, शरद दरेकर, नितीन निमकर्डे, अनिल मानकर, उत्तम घारे, पंकज चातुरकर, अशोक राठी व कर्मचारी उपस्थित होते.

नरेश भार्गव साहसिक NEWS -/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!