आष्टी येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात भोंगळ कारभार……

0

🔥प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी लोखंडे यांच्यामुळे अंगनवाडीत विद्यार्थी संख्या झाली कमी,पालकांचा आरोप.

साहुर -/ आष्टी तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात भोंगळ कारभार सुरू असुन हम करे सो कायदा अशाप्रकारचे वर्तन असणारे प्रभारी नितीन लोखंडे यांच्यामुळे साहुर येथील अंगणवाड्यातील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याचे मत येथील पालकांनी व्यक्त केले आहे अनेक वेळा पालकांनी तसेच ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन, ग्रामपंचायतचा ठराव देण्यात आला परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले लहान मुलांना वाहतुकीचे रस्ते ओलांडावे लागतात तसेच वार्ड क्रमांक एक च्या मुलांना वार्ड क्रमांक चार मध्ये जावे लागते तर वार्ड क्रमांक चार च्या मुलांना वार्ड क्रमांक एक मध्ये जावे लागतील अशाप्रकारची रचना असल्याने पालक आपल्या मुलांना अंगणवाडीत पाठवत नाही यामुळे साहुर येथील विद्यार्थी शिक्षणापासून व आहारापासून वंचित आहेत म्हणून ज्या वार्डातील मुले त्याच वार्डात बसवावी अशाप्रकारचे निवेदन पालक गेल्या अनेक वर्षांपासून देत आहे परंतु प्रभारी नितीन लोखंडे हे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने पालक आपल्या मुलांना अंगणवाडीत पाठवत नाही त्यामुळे साहुर येथील अंगणवाड्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत फक्त आम्हाला गलेलठ्ठ पगार द्यावा मुले अंगणवाडीत येवो की नाही येवो अशाप्रकारची विचार धारणा असलेल्या लोखंडे यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी पालक वर्ग करणार असल्याची माहिती पालकांनी दिली हे विशेष.

                                (क्रमशः)

शरद वरकड साहसिक News-/24 साहूर आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!